⁠ 
मंगळवार, एप्रिल 16, 2024

अबब.. तिरुपती मंदिराची संपत्ती ऐकून व्हाल थक्क, ट्रस्टकडून मालमत्ता घोषित

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ नोव्हेंबर २०२२ । देशातील श्रीमंत देवस्थानांपैकी एक म्हणजे तिरुपती बालाजी मंदिर (Tirupati Balaji Temple). हे देवस्थान देशातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक असून याच्या संपत्तीचा विषय अनेकदा चर्चेत असतो. अशातच तिरुमाला तिरुपती देवस्थानम्स (TTD) ने शनिवारी एक श्वेतपत्रिका जारी केली आणि रोख, ठेवी, सोने यासह त्याच्या मालमत्तेची संपूर्ण यादी जाहीर केली.

त्यात मंदिराची एकूण मालमत्ता (तिरुपती मंदिर नेट वर्थ) अंदाजे 2.26 लाख कोटी रुपये आहे, तर 10.3 टन सोने जमा आहे. मंदिर समितीने नव्याने जारी केलेल्या अहवालात ही माहिती दिली आहे. मंदिराची ही संपत्ती देशातील दिग्गज कंपन्यांच्या मालमत्तेपेक्षाही अधिक आहे. तिरुमला तिरुपती देवस्थानाची (TTD) स्थापना 1933 साली झाली होती. त्यानंतर पहिल्यांदाच मंदिर समितीने एकूण संपत्तीची माहिती जाहीर केली आहे.

2.26 लाख कोटींची मालमत्ता
TTD च्या वतीने मंदिराच्या मालमत्तेची घोषणा करताना, असे सांगण्यात आले की सध्याच्या विश्वस्त मंडळाने 2019 पासून आपली गुंतवणूक मार्गदर्शक तत्त्वे मजबूत केली आहेत. अतिरिक्त रक्कम शेड्युल्ड बँकांमध्ये गुंतवली जाते. मंदिर ट्रस्टने दिलेल्या माहितीनुसार, तिरुमला तिरुपती देवस्थानमची एकूण संपत्ती 2.26 लाख कोटी रुपये आहे. राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये त्यांच्याकडे ५,३०० कोटींहून अधिक किमतीच्या १०.३ टन सोन्याच्या ठेवी आहेत. याशिवाय जमा केलेली रोकड 15,938 कोटी रुपये आहे.