---Advertisement---
प्रशासन महाराष्ट्र

औरंगाबाद सभेसाठी तगडा पोलीस बंदोबस्त

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्युज । २९ एप्रिल २०२२। औरंगाबाद येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची १ मे महाराष्ट्रदिनी जाहीर सभा होणार आहे. या सभेसाठी सहा हजाराहून अधिक पोलिसांसमवेत एसआरपीएफच्या तुकड्या देखील तैनात करण्यात आल्या आहेत. दुसरीकडे मनसे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांवर देखील पोलिसांची करडी नजर असणार आहे.

पोलीस

सभेला होणारी गर्दी लक्षात घेता, प्रशासनाकडून चोख सुरक्षा व्यवस्था केली जात आहे. शहरातील उपलब्ध पोलीस दलातील सुमारे ६ हजाराहून अधिक कर्मचारी, यात ३ उप आयुक्त, ६ सहायक उप आयुक्त, ३० पोलीस निरीक्षक, २५० च्यावर पोलीस उपनिरीक्षक यांचेसह अडीच हजाराहून पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. त्यासोबतच राज्य राखीव पोलीस दलाच्या १२० जणांची एक याप्रमाणे ६ तुकड्या यात ७२० एसआरपीएफ जवान शनिवारी औरंगाबाद शहरात येतील, तर शेजारच्या जालना तसेच औरंगाबाद जिल्ह्यातील राज्य राखीव पोलीस दलाची आवश्यकता असल्यास अन्य जिल्ह्यातील तुकड्या देखील मागवण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे.

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---