⁠ 
मंगळवार, मार्च 5, 2024

रेल्वेतून पडल्याने दोन घटनांमध्ये तीन जण ठार ; रावेर नजीक घटना

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ डिसेंबर २०२३ । रेल्वेतून पडल्याने दोन घटनांमध्ये तीन जणांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रावेर रेल्वे स्थानकानजीक घडल्या. याप्रकरणी रेल्वे पोलिसात गुन्हा नोंदविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

याबाबत असे की, रावेर तहसील कार्यालयातील निवृत्त कर्मचारी रतन राजाराम भालेराव (६३) हे रावेरहून भुसावळकडे रेल्वेने येत होते. गाडीने रावेर रेल्वे स्थानक सोडताच ते खाली पडले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सकाळी ११:३० वाजता घडली.

दुसऱ्या घटनेत खंडवा येथील बॅन्ड पथकातील आकाश किशोर वेद आणि मोनू बल्लन मुंडले हे दोन तरुण पुष्पक एक्स्प्रेसने भुसावळ येथे लग्न समारंभासाठी येत होते. हे दोघे जण बोगीच्या दरवाज्याजवळ बसले होते. रावेर रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या बोगद्याजवळ दोघे जण खाली पडले. यातच दोघांचाही मृत्यू झाला. याप्रकरणी रेल्वे पोलिसात गुन्हा नोंदविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.