भडगावच्या तीन अल्पवयीन मुलींची राजस्थानमधून सुटका ; तिघा संशयित तरुणांना अटक

नोव्हेंबर 15, 2025 10:38 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । भडगाव पोलिसांनी एका गंभीर प्रकरणाचा अवघ्या काही दिवसांत यशस्वी उलगडा केला आहे. भडगाव पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावातून बेपत्ता झालेल्या एकाच कुटुंबातील तीन अल्पवयीन मुलींची राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातून सुखरूप सुटका करण्यात आली असून, या प्रकरणात तिन्ही संशयित तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

bd

याबाबत असे की, भडगाव तालुक्यातील एकाच गावातील एकाच कुटुंबातील तीन अल्पवयीन मुली अचानक बेपत्ता झाल्या होत्या. या प्रकरणी भडगाव पोलिस ठाण्यात नोंद झाली होती. अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्यावर पोलिसांनी तपास सुरू केला.सर्वांचे मोबाइल बंद असल्याने तपास गुंतागुंतीचा झाला होता. पोलिसांनी जळगाव रेल्वे स्टेशनवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले. त्यात २० ऑक्टोबरला रात्री ९ वाजून २२ मिनिटांनी या मुली आणि संशयित तरुण रेल्वे स्टेशनमधील तिकीट घराजवळ दिसल्याचे स्पष्ट झाले.

Advertisements

याच सुमारास झेलम एक्सप्रेस सुटत असल्याचे आढळल्याने पोलिसांनी तपासाची दिशा राजस्थानकडे केंद्रित केली. तांत्रिक माहितीच्या आधारे बेपत्ता मुली राजस्थानमधील अलवर जिल्ह्यात असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर भडगाव पोलिसांनी तात्काळ पथक पाठवून अलवरमध्ये छापा टाकला. तसेच तिन्ही मुलींसह संशयित रोशन उर्फ श्रावण धनगर मालचे, अजय सुकलाल देवडे आणि अमोल ईश्वर सोनवणे यांना ताब्यात घेतले. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक महेश शर्मा यांच्या पथकाने केला.

Advertisements

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now