कंटेनर आणि रिक्षाच्या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू; दोन जण गंभीर
जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जानेवारी २०२५ । राज्यात अपघाताच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत असून आणखी एका भीषण अपघाताची घटना समोर आलीय. कंटेनर आणि रिक्षाच्या भीषण अपघातामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झालाय. तर दोन जण गंभीर जखमी आहेत. ही घटना नाशिकमधील घोटी सिन्नर मार्गावर घडली. याप्रकरणी चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
सिन्नर घोटी मार्गावर एसएमबीटी हॉस्पिटलजवळ रिक्षा आणि कंटेनरचा भीषण अपघात झालाय. या अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू झालाय. त्यामध्ये एका चिमुकलीचाही समावेश आहे. या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत, त्यांना जवळच्या रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेय. सिन्नर घोटी मार्गावर एसएमबीटी हॉस्पिटलजवळ ओव्हर टेक करण्याच्या नादात कंटेनर चालकाने समोरून येणाऱ्या रिक्षाला उडवले. या अपघातानंतर परिसरात एकच धावपळ उडाली. स्थानिकांनी धाव घेत मदत केली, जखमींना त्यांनी तात्काळ रूग्णलयात दाखल केले. त्याशिवाय चालकाला पोलिसांच्या ताब्यात दिलेय. नाशिक पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
नाशिकमधील घोटी-सिन्नर महामार्गावर मंगळवारी सकाळी झालेल्या भीषण अपघाताने परिसर हादरला. कंटेनर आणि रिक्षामध्ये झालेल्या या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून, दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एका चिमुकलीचाही समावेश आहे. अपघातानंतर स्थानिकांनी तातडीने धाव घेऊन मदतकार्य केले आणि जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. हा अपघात एसएमबीटी हॉस्पिटलजवळ घोटी-सिन्नर मार्गावर ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात घडला. कंटेनर चालकाने समोरून येणाऱ्या रिक्षाला जोरात धडक दिली, ज्यामुळे रिक्षामधील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर कंटेनर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, आणि नाशिक पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली, आणि नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.