जळगाव लाईव्ह न्यूज । २३ मे २०२१ । भुसावळ शहरात शुक्रवारी मध्यरात्रीनंतर शहर व बाजारपेठ पोलीस ठाणे हद्दीत कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात येवून गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यात आली. त्यात वॉण्टेड तिघे गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात आल्या तर संशयास्पदरीत्या फिरणार्या चौघांना ताब्यात घेण्यात आले तसेच रात्री उशिरापर्यंत हॉटेल सुरू ठेवल्याने एका हॉटेल चालकावर कारवाई करण्यात आली.
दरम्यान, पंधरा बंगला परिसरात सुध्दा वाहनांची गर्दी होताच पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांनी धाव घेतली. तेथे चार ट्रक मिळून आल्याने त्यांच्याकडून प्रत्येकी एक हजार रुपयांप्रमाणे दंड करण्यात आला. कोम्बिंगमध्ये सहा.पोलीस निरीक्षक अनिल मोरे, कृष्णा भोये, गणेश धुमाळ, एपीआय संदीप दुनगहू व शहर व बाजारपेठचे कर्मचारी सहभागी झाले.
पोलिसांनी विविध गुन्ह्यातील संशयीत, वॉरंटमधील संशयित, वॉण्टेड आरोपी, दाखल गुन्ह्यात पसार असलेल्या संशयितांची तपासणी करण्यात आली. वॉण्टेड 18 पैकी तिघांना अटक करण्यात आली. हॉटेल प्रिमीयर मागे कृष्णा पन्नालाल धोबी तसेच आकाश बोदडे संशयीतरीत्या मिळून आला.