बडोदा ते इंदोर ८ हजार कोटीचा चौपदरी महामार्ग होणार
जळगाव लाईव्ह न्युज । २२ एप्रिल २०२२ । अनेक मार्ग पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे हे पाहण्याची संधी मला मिळाली याचा आनंद आहे २०१४ नंतर ४०९ किमीचे नवीन राष्ट्रीय महामार्गात २११ टक्के वाढ झाली. सात वर्षात जळगाव जिल्ह्यासाठी ६ हजार कोटी किमीची कामे त्यात पाच कामे पूर्ण झाली. आता साडे सात हजार कोटीची कामे करणार ३३ कामे मंजूर झाले असून त्यात १५ कामे पूर्ण करण्यात आले आहे. तळोदा से बऱ्हाणपूर राष्ट्रीय महामार्ग ७५३ किमी मध्यप्रदेश,महाराष्ट्र,जळगाव,धुळे,नंदुरबार यांना मिळतो २३० किमीची लांबी असून गुजरात,महाराष्ट्र, मध्य प्रदेश मार्गांना जोडणारा हा मार्ग असेल या मार्गाचे चौपदरीकरण लवकरच करून याच्याही भूमिपूजनाला येईल असे केंद्रीय रस्ते व दळणवळण वाहतूक मंत्री ना.नितीन गडकरी यांनी सांगितले.
आठ हजार कोटींची कामे पूर्ण होतील यासाठी आपल्या आमदार-खासदारांनी सातत्याने पाठपुरावा केला त्यामुळे हे शक्य झाले जिल्ह्याच्या विकासाला नक्कीच फायदा होईल.
ना.गडकरी यांच्या सभेतील महत्वपूर्ण घोषणा
◆ जळगाव ड्रायपोर्ट – महाराष्ट्र शासन प्रस्ताव पाठवा इंटरनॅशनल धर्तीवर करणार
◆ N 853 अंकलेश्वर – बऱ्हाणपूर महामार्ग चौपदरीकरण
◆ कन्नड बोगदा – चौपदरीकरण
◆ जळगाव शहरात मोठा उड्डाणपूल
◆ जळगाव शहरातील भाग नं 2 सर्व्हिस रोड, गिरणा नदीवर पूल,लाईट,उर्वरित पाळधी बायपास ते खोटे नगर व कलिंका माता ते तरसोद चौपदरीकरण
◆ नार -पार- तापी – गिरणासाठी गुजरात व महाराष्ट्र राज्याने,मुख्यमंत्ती चर्चा करून सोडवू
◆जळगाव जिल्ह्या व नाशिक,खान्देशकरिता अमेरिका स्टॅंडर्ड सारखे दर्जेदार रोड भविष्यात होणार
◆ जळगाव शहराकरिता वायरलूप एअर बस
◆ जिल्ह्याकरिता 15000 हजार कोटींची भविष्यातील नवीन कामे अमलात आणणार
जिल्ह्यातील २३९० कोटींच्या ७ महामार्ग प्रकल्पांचे त्यांच्या हस्ते आज जी.एस.ग्राउंड वर लोकार्पण केले. ७० कोटींच्या ९ प्रकल्पांचे भूमिपूजन देखील करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर ना.नितीन गडकरी, पालकमंत्री गुलाबराव पाटील, खा.रक्षा खडसे, खा,उन्मेष पाटील, आ.गिरीश महाजन, संजय सावकारे, आ.लताताई सोनावणे, महापौर जयश्री महाजन, मंगेश चव्हाण, स्मिता वाघ यांसह मान्यवरांची उपस्थिती होती.