---Advertisement---
वाणिज्य राष्ट्रीय

अलर्ट! १ एप्रिलपासून पैशांसंबधित अनेक नियम बदलणार, तुमच्या माहितीसाठी आताच जाणून घ्या..

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ मार्च २०२५ । दरमहिन्याच्या पहिल्या तारखेला अनेक नियमात बदल होत असतात. मार्च महिला संपला आता अवघे सहा दिवस राहिले. यांनतर १ एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरु होणार आहे. त्यानुसार १ एप्रिलपासून पैशांसंबधित अनेक नियम बदलणार आहेत.यामध्ये एटीएममधून पैसे काढणे ते यूपीआय अशा सर्व नियमांचा समावेश आहे. नेमके कोणते नियम बदलणार आहेत? ते जाणून घेऊया…

1st april

पॉझिटिव्ह पे सिस्टीम
व्यवहारांची सुरक्षितता वाढवण्यासाठी, पॉझिटिव्ह पे सिस्टीम सुरू केली जात आहे, ज्यामध्ये ५०,००० रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या पेमेंटसाठी चेक अनिवार्य असेल. यामध्ये, ग्राहकांना पैसे जमा करण्यापूर्वी चेकच्या तपशीलांची पडताळणी करावी लागेल, ज्यामुळे फसवणूक आणि चुकांचा धोका कमी होऊ शकतो.
धनादेशाद्वारे केलेल्या पेमेंटमध्ये अधिक पारदर्शकता आहे.

---Advertisement---

ATM मधून पैसे काढण्यावर लागणार फी
एटीएमच्या नियमांमध्ये मोठा बदल करण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेने याबाबत निर्देश जारी केले आहे. यामध्ये एटीएममधून मोफत पैसे काढण्याची मर्यादा कमी केली आहे. आता तुम्ही महिन्यातून फक्त तीनदा एटीएममधून कोणत्याही चार्जशिवाय पैसे काढू शकतात. यानंतर तुम्हाला प्रत्येक ट्रान्झॅक्शनवर २० ते २५ रुपये शुल्क द्यावे लागणार आहे.

यूपीआय खाते होणार बंद (UPI Rule Change)
यूपीआयच्या नियमांमध्येही बदल करण्यात येणार आहे. यामध्ये जे मोबाईल नंबर यूपीआय खात्याशी जोडले आहेत परंतु खूप कालावधीसाठी त्याचा वापर केलेला नाही त्यांना बँक रेकॉर्डमधून काढण्यात येणार आहे. जर तुम्ही खूप कालावधीसाठी यूपीआय वापरले नाही तर तुमची सेवा बंद केली जाणार आहे.

टॅक्सच्या नियमांमध्ये बदल
नवीन आर्थिक वर्षात टॅक्सच्या नियमांमध्येही बदल होणार आहे. यामध्ये नवीन कर प्रणाली लागू केली जाणार आहे. यामध्ये वेगवेगळ्या उत्पन्नासाठी वेगवेगळा टॅक्स भरावा लागणार आहे. यामध्ये कलम 80C अंतर्गत कोणताही बदल करण्यात आला नाही.

बचत खात्याच्या नियमांत बदल
आता तुम्हाला बचत खात्यात कमीत कमी बॅलेंस ठेवणे गरजेचे आहे. जर तुम्ही बॅलेंस ठेवला नाही तर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. वेगवेगळ्या बँकेचे, ब्रँचचे बचत खात्याबाबत वेगवेगळे नियम आहेत. ग्रामीण, शहरी, सेमी अर्बन या ठिकाणी बँकेत किमान बॅलेंस ठेवण्याची मर्यादा वेगवेगळी आहे.

डिजिटल बँकिंगमध्ये AI चा वापर
आता लवकरच डिजिटल बँकिंगमध्ये एआयचा वापर केला जाणार आहे. AI बँकिंग असिस्टंटमुळे ग्राहकांना सल्ले दिले जाणार आहेत. यासाठी AI पावर्ड चॅटबॉक्स लाँच केले जाणार आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

Leave a Comment