⁠ 
[rank_math_breadcrumb]

दुचाकीसह दुकान फोडून मुद्देमाल लांबविणारा चोरटा पोलिसांच्या जाळ्यात

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जानेवारी २०२५ । जळगाव शहरासह जिल्ह्यात घरफोडीसह दुचाकी चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढले असून यामुळे चोरट्यांना खाकीचा धाकच शिल्लक असल्याचं दिसून आले. मात्र याच दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेने एक संशयित आरोपीला शहरातील अजिंठा चौकातून अटक केली आहे. हा आरोपी प्रविण वसंत सपकाळे (वय ४४, रा. भोलाणे) आहे ज्याने पोलनपेठ येथील तीन दुकाने आणि चित्रा चौकातील कापड दुकान फोडून मुद्देमाल चोरला होता.

चित्रा चौकात २ जानेवारी रोजी कापड दुकानातून फोडून ८ हजार रुपयांची रोकड लांबविली होती, तर ६ जानेवारी रोजी पोलनपेठ येथील पॉप्युलर ट्रेडर्स, योगेश प्रोव्हिजन, आणि तिरुपती हेअर आर्ट अशी तीन दुकाने फोडून मुद्देमाल चोरून नेला होता. पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या आदेशानुसार, स्थानिक गुन्हे शाखेने तपास सुरू केला आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे, आरोपी प्रविण सपकाळे याला अंजिठा चौफुली येथून अटक करण्यात आली.

आरोपीला अटक करण्यात आल्यानंतर, त्याच्याकडून १९ हजार ९८० रुपये रोख जप्त करण्यात आले आहेत. या आरोपीवर यापूर्वी घरफोडीचे तीन गुन्हे दाखल आहेत आणि त्याने चोरीची कबुली दिली आहे. पुढील कारवाईसाठी आरोपीला जळगाव शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपास पथकात पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, सहाय्यक फौजदार राजेश मेढे, संजय हिवरकर, अतुल वंजारी, पोलीस कॉन्स्टेबल विजय पाटील, हरीलाल पाटील, आणि प्रदीप चवरे यांनी सहभाग घेतला.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.