⁠ 
सोमवार, नोव्हेंबर 25, 2024
Home | बातम्या | FD करण्याचा विचार करताय? या बँकांमध्ये मिळतोय जास्त व्याज ; तपासून घ्या व्याजदर

FD करण्याचा विचार करताय? या बँकांमध्ये मिळतोय जास्त व्याज ; तपासून घ्या व्याजदर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ मे २०२४ । या वेळी चांगले व्याजदर पाहून तुम्ही एफडीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त आहे. काही खासगी बँकांकडून एफडीवर बंपर व्याज दिले जात आहे. रेपो रेट ६.५ टक्क्यांवर पोहोचल्यानंतर अनेक बँका एफडीवर चांगला परतावा देत आहेत. युनिटी आणि सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक त्यांच्या ग्राहकांना 9 टक्क्यांहून अधिक व्याज देत आहेत. या दोन्ही लघु वित्त बँकांमधील काही मुदतीच्या FD वरील गुंतवणूक PPF, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) आणि सुकन्या समृद्धी योजना (SSY) सारख्या गुंतवणूक योजनांपेक्षा खूप जास्त आहे.

युनिटी स्मॉल फायनान्स बँक
युनिटी स्मॉल फायनान्स बँक नियमित ग्राहकांना ४.५% ते ९% पर्यंत व्याज देत आहे. बँक ज्येष्ठ नागरिकांना वार्षिक ९.५% व्याज देत आहे. हे व्याज एफडीवर 1001 दिवसांच्या कालावधीसह दिले जात आहे. परंतु सामान्य गुंतवणूकदारांसाठी हे व्याज 9% आहे. ज्येष्ठ नागरिकांना 7 दिवस ते 10 वर्षांच्या मुदतीत ठेवींवर बँकेकडून 4.5% ते 9.5% पर्यंत व्याजदर मिळतात.

सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक
सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक सामान्य ग्राहकांना 7 दिवस ते 10 वर्षांच्या मुदतीच्या FD वर 4% ते 9.1% पर्यंत व्याज देत आहे. बँकेकडून, ज्येष्ठ नागरिकांना 7 दिवस ते 10 वर्षांच्या मुदतीच्या ठेवींवर 4.5% ते 9.6% पर्यंत व्याज मिळत आहे. पाच वर्षांच्या कालावधीसाठी सर्वाधिक 9.1% व्याजदर दिला जातो. सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेने सांगितले की, नियमित ग्राहकांना 5 वर्षांच्या ठेवींवर 9.10% व्याजदर मिळू शकतो. ज्येष्ठ नागरिकांसाठी हा व्याजदर ०.५ टक्के जास्त म्हणजे ९.६० टक्के आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.