⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | पर्यटन | ‘ही’ आहेत बेंगळुरूजवळील 5 सुंदर हिल स्टेशन ; तुम्ही इथल्या सौंदर्यात हरवून जाल..

‘ही’ आहेत बेंगळुरूजवळील 5 सुंदर हिल स्टेशन ; तुम्ही इथल्या सौंदर्यात हरवून जाल..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । भारतात फिरण्यायोग्य अनेक ठिकाणे आहेत. बहुतांश जणांना हिल स्टेशन फिरायला आवडते. जर तुमचेही हिल स्टेशन फिरायचा प्लॅन असेल तर आज आम्ही तुम्हाला भारताचे आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेंगळुरूजवळील 5 सुंदर हिल स्टेशनबाबत सांगणार आहोत. थंड वारे आणि उंच पर्वतांना तुम्हाला भेट देता येते, इथल्या सौंदर्यात तुम्ही हरवून जाल. चला तर जाणून घेऊया या प्रसिद्ध आणि अतिशय सुंदर ५ हिल स्टेशन्सबद्दल.

1) नंदी टेकड्या (Nandi Hills)

बेंगळुरूपासून अवघ्या 62 किलोमीटर अंतरावर असलेले नंदी हिल्स देखील एक उत्तम पर्यटन स्थळ ठरेल. बरेच लोक वीकेंड गेटवेसाठी येथे येतात. जर तुम्हाला साहसाची आवड असेल तर तुम्ही येथे पॅराग्लायडिंग आणि माउंटन बाइकिंगचा आनंद घेऊ शकता. यासोबतच तुम्ही येथे सूर्योदयाच्या सुंदर दृश्यांचाही आनंद घेऊ शकता, सकाळी ढगांच्या वर जाऊन सूर्य मागून बाहेर येताना पाहणे तुम्हाला एक वेगळा अनुभव देईल.

२) कुर्ग (Coorg)

कुर्गला भारताचे स्वित्झर्लंड म्हटले जाते. इथे रोज दुपारी 4 नंतर पाऊस पडतो असे सांगितले जाते. हे इतके सुंदर आहे की तुम्ही इथल्या सौंदर्यापासून फार काळ दूर जाऊ शकणार नाही. कूर्ग चहा-कॉफीच्या बागांसाठी प्रसिद्ध आहे. हिरवेगार डोंगर आणि त्यातून येणारा सुगंध अप्रतिम आहे.यासोबतच इथले प्राचीन तलाव, सुंदर धबधबे, घनदाट जंगल आणि वळणदार रस्ते तुमचा प्रवास अविस्मरणीय बनवतील.

३) चिकमंगळूर (Chikmagalur)

चिकमंगळूर हे ‘कर्नाटकची कॉफी लँड’ म्हणून ओळखले जाते, कॉफी उत्पादनाव्यतिरिक्त ते हिरव्यागार वनस्पतींनी वेढलेले एक पर्यटन स्थळ आहे. तुम्ही बाबा बुडनगिरी पर्वत शिखरावर ट्रेकिंगसह वाघ, हत्ती आणि बिबट्या पाहण्यासाठी जंगल सफारीवर देखील जाऊ शकता. चिकमंगळूर हा नैसर्गिक दृष्यांचा अनोखा संगम आहे, इथे पावसात भेट देण्यासारखे काही औरच आहे

4) सावंदुर्गा (Savandurga)

बेंगळुरूपासून ६० किलोमीटर अंतरावर सवनदुर्गा नावाची टेकडी आहे. हे आशियातील सर्वात मोठ्या टेकड्यांपैकी एक मानले जाते. हे ठिकाण अत्यंत प्रसन्न वातावरण आणि सुंदर सूर्यास्त आणि सूर्योदयासाठी ओळखले जाते.

5) रामनगर (Ramnagar)

जर तुम्हाला नैसर्गिक सौंदर्य आणि पक्ष्यांची आवड असेल, तर तुम्ही बंगलोरजवळील रामनगराला भेट देऊ शकता. येथे तुम्हाला भारतीय आणि इजिप्शियन गिधाडे आढळतील. याशिवाय येथील सौंदर्य तुमच्या मनाला शांती देईल. ‘शोले’ या ब्लॉकबस्टर चित्रपटाचे चित्रीकरण बंगळुरूपासून 56 किमी अंतरावर असलेल्या रामनगरात झाले.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.