⁠ 
[rank_math_breadcrumb]

एकनाथ शिंदेंच्या या ३ मंत्र्यांना मिळणार डच्चू; कोण आहेत वाचा…

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । महायुतीचा सत्तास्थापनेचा तिढा अखेर सुटला असून उद्या ५ डिसेंबर रोजी मुंबईत शपथविधी सोहळा होणार असून या नव्या सरकारमध्ये स्वच्छ चारित्र्याचे आणि भ्रष्ट्राचाराचे आरोप असणाऱ्या माजी मंत्र्यांना डच्चू मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या आदेशानंतर एकनाथ शिंदे यांच्या ३ मंत्र्यांना नव्या सरकारच्या मंत्रिमंडळातून डच्चू मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेना आमदारांची धाकधूक वाढली आहे.

शिवसेनेच्या या माजी मंत्र्यांना मिळू शकतो डच्चू –
१) संजय राठोड
माजी जलसंधारण मंत्री म्हणून सूमार कामगीरी. तसेच बंजारा समाजातील एका तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात गंभीर आरोप करण्यात आले होते.

२) अब्दूल सत्तार –
माजी कृषी मंत्री आणि अल्पसंख्यांक मंत्री विभागांतर्गत कारभारात मोठा भ्रष्ट्राचार झाल्याचे अनेक आरोप करण्यात आलेत. या आरोपांची चौकशी करण्यासाठी समिती ही नेमण्यात आली आहे.

३) तानाजी सावंत –
माजी आरोग्य मंत्री विभागात कामकाजात आर्थिक गैरव्यव्हाराचे आरोप करण्यात आलेत. तसेच पक्ष संघटनात्नक अनेक नाराजीच्या तक्रारी मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे अनेकवेळा आल्या आहेत.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.