जळगावात बांधकाम ठिकाणाहून इलेक्ट्रिक वस्तूंची चोरी; जिल्हापेठ पोलीसात गुन्हा दाखल

मार्च 22, 2021 3:40 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ मार्च २०२१ । शहरातील पंचमुखी हनुमान मंदिराजवळ दवाखान्याचे बांधकाम ठिकाणाहून स्वीच व इलेक्ट्रिक वायर असा एकुण १३ हजार रूपयांचा मुद्देमाल २१ मार्च रोजी अज्ञात चोरट्यांनी लांबविला. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीसात रात्री उशीरा अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

crime

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, डॉ. राहुल अरुण चिरमाडे (वय-३७) रा.जानकी नगर गणेशवाडी यांचे नवीन पंचमुखी हनुमान मंदिराजवळ दवाखान्याचे बांधकामाचे काम गेल्या महिन्याभरापासून सुरू आहे. 21 मार्च रोजी सकाळीच्या 4 ते सायंकाळी 5 वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी दवाखान्याचे बांधकाम चालू असलेल्या ठिकाणावरून 32 नग एमसीबी स्विच आणि 100 फूट इलेक्ट्रिक वायर असा एकूण 13 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला आहे. याप्रकरणी डॉ. राहुल चिरमाडे यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील करीत आहे.

Advertisements

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now