---Advertisement---
गुन्हे भडगाव

भडगावात चोरट्यांचा धुमाकूळ ; दोन दुकानासह एक हॉटेल फोडले, 27 हजारांचा ऐवज लंपास

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ ऑक्टोबर २०२२ । भडगाव शहरातील मेन रोड वरील व्यंकटेश प्लाझा या शॉपिंग कॉम्प्लेक्स मधील महावीर कापड दुकान, माऊली जनरल स्टोअर्स व पाचोरा रस्त्यावरील मंगल आनंद या हॉटेलमधून काल मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटरला लावलेले कुलूप व लोखंडी गेट तोडून एकूण 27 हजार रुपयाचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली आहे. या बाबत भडगाव पोलिस स्टेशनला अज्ञात चोरट्यां विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

chori 2

या बाबत अधिक माहिती अशी की, दि.12 रोजी मध्यरात्री व्यंकटेश प्लाझा या शॉपिंग कॉम्प्लेक्स मधील महावीर कापड दुकान या दुकानाचे शटर चे कुलूप तोडून यातील 15000 हजार रु किमतीचे काऊंटर मधील जीन्स पँट, शर्ट, 3000 हजार रुपये रोख, असा मुद्देमाल महावीर कापड दुकानातून गेला तसेच आबा धनगर यांचे माऊली जनरल स्टोअर्स या दुकानातून 3000 हजार रुपये किमतीचे स्कूल बॅग व इतर साहित्य व काऊंटर मधून रोख 5000 हजार रुपये असा मुद्देमाल लंपास केला.

---Advertisement---

यानंतर पाचोरा रस्त्यावरील आनंदा महाजन यांच्या मंगल आनंद हॉटेल मधून या चोरट्यांनी 70 रुपये रोख गोल्ड फ्लक, पान, लाईट सिगारेटचे अंदाजे 700 रुपये किमतीचे दहा पॉकेट असा एकूण तिन्ही दुकानातून 27000 हजार रुपये चा मुद्देमाल शटर चे कुलूप तोडून, लोखंडी च्यानल गेटचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने चोरून नेले म्हणून फिर्यादी – शुभम संजय जैन (वय- 24) रा. भडगाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भडगाव पोलिस स्टेशन ला अज्ञात चोरट्या विरूद्ध भाग 5 गु.र. न.288/2022 भा. द.वी. कलम 380,454,457, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.हे.कॉ. विलास पाटील हे करीत आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---