जळगाव लाईव्ह न्यूज । २२ मे २०२१ | जिल्ह्यातील पहूर येथील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी गुन्ह्याच्या तपासाचा जाब विचारायला गेलेल्या तरुणाला मारहाण केल्याचा प्रकार ताजा असतानाच आणखी एक प्रकार समोर आला आहे.
दुचाकी चोरीच्या संशयावरून एलसीबीच्या पथकाने पुणे येथून ताब्यात घेतलेल्या नितीन पाटील रा.शिवकॉलनी या तरुणाला पोलिसांनी पुणे येथे, रस्त्यात जंगलात आणि जळगावात बेदम मारहाण केल्याचा आरोप त्याने केला आहे.
तरुणावर सध्या डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू असून त्याच्या आईने याबाबत पोलीस अधिक्षकांकडे तक्रार करणार असल्याचे ‘जळगाव लाईव्ह न्यूज’शी बोलताना सांगितले.
https://www.facebook.com/JalgaonLiveNews/videos/1387468708278774/