भुसावळ

शिवजयंतीला जळगाव जिल्ह्यातील तरुणांनी जिंकले संभाजी राजेंचे मन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ मार्च २०२२ । तिथीनुसार साजर्‍या होणार्‍या शिवजयंतीचा सर्वत्र उत्साह दिसून येत आहे. अनेक ठिकाणी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भुसावळ येथे आयोजित कार्यक्रमाचे कौतूक दस्तुरखुद्द भाजपाचे खासदार संभाजीराजे यांनी केले आहे. शिवभक्तांचा उत्साह पाहून त्यांनी भुसावळ रेल्वे स्टेशनवरच सर्वांशी वेगवेगळ्या विषयांवर सुमारे अर्धातास भरभरून गप्पा मारल्या. राजेंचा हा साधेपणा पासून त्यांनी उपस्थितांसह सर्व जिल्हावासियांची मने जिंकली आहे.

याबाबतची माहिती स्वत: संभाजीराजेंनी त्यांच्या फेसबुक पेजवर दिली आहे. वाचा त्यांच्याच शब्दात….
‘जळगाव जिल्ह्यात एका कार्यक्रमानिमित्त गेलो असता, कार्यक्रम आटोपून मुंबईस निघण्यासाठी रात्री १ वाजता भुसावळ रेल्वे जंक्शनला पोहोचलो. रात्री दीड वाजता भुसावळ येथून निघणार्‍या दूरांतो एक्स्प्रेसची वाट पाहत स्टेशनवर थांबलो होतो. तोच दुरून डोक्यावर भगवी टोपी परिधान केलेले १५-२० तरूण प्लॅटफॉर्मवर धावत येत असलेले दिसले. तिथीनुसार साजर्‍या होणार्‍या शिवजयंतीची ते स्टेशन लगतच तयारी करत होते. कुठूनतरी मी स्टेशनवर आल्याची बातमी त्यांना कळताच ते धावतपळत मला भेटायला आले होते. ट्रेन यायला अजून अर्ध्या तासाचा अवधी होता. त्यामुळे या सर्व शिवभक्तांचा उत्साह पाहून मीदेखील तिथेच त्यांच्यासोबत बसून वेगवेगळ्या विषयांवर भरभरून गप्पा मारल्या.

दिवसभराचा प्रवास व कामाचा जो थोडा शीण आला होता, तो या निस्सीम शिवभक्तांसोबत वेळ घालवल्यामुळे कुठल्या कुठे निघून गेला. त्यांच्या चेहर्‍यावरील उत्साह व आनंद पाहून मलाही समाधान वाटले. या छोट्या छोट्या गोष्टींतून दिसणारे जनतेचे माझ्यावरील प्रेम, हेच मला सदैव कामात राहण्याची ऊर्जा देत असते…’

https://www.facebook.com/136216326536595/posts/2112322655592609/

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button