⁠ 
शुक्रवार, जानेवारी 10, 2025
Home | जळगाव जिल्हा | ..म्हणून महिलांनी जळगाव महानगरपालिकेला कूलूप ठोकून केलं आंदोलन

..म्हणून महिलांनी जळगाव महानगरपालिकेला कूलूप ठोकून केलं आंदोलन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १० जानेवारी २०२५ । जळगाव शहरातील वार्ड क्रमांक १४ मधील रामेश्वर कॉलनी, हनुमान नगर, रेणुका नगर आणि मेहरूण परिसरातील स्थानिक महिलांनी विविध समस्यांबाबत महानगरपालिकेच्या कार्यालयात धडक दिली मात्र यावेळी आयुक्तासह इतर विभागातील जबाबदार अधिकारी दालनात उपलब्ध नसल्याचे दिसून आल्यामळे संतप्त महिलांनी थेट महानगरपालिकेचे मुख्य प्रवेशद्वाराला कूलूप ठोकून महापालिका प्रशासनाच्या विरोध विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केलं.

मूलभूत सुविधांचा अभाव
जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी, हनुमान नगर, रेणुका नगर आणि मेहरूण परिसरात रस्ते, गटारी, पिण्याचे पाणी, घंटागाडी आणि स्वच्छता यासारख्या मूलभूत सुविधा पुरविण्यात महापालिका अपयशी ठरली आहे. यामुळे येथील नागरिक आणि महिलांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यापूर्वीही स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी, निवेदने, आंदोलने आणि उपोषणे केली होती, परंतु प्रशासनाने याची कोणतीही दखल घेतलेली नाही.

महापालिका आयुक्तांशी भेट घेण्याचा प्रयत्न
महिलांनी महानगरपालिकेच्या आयुक्तांशी भेट घेण्याचा प्रयत्न केला, परंतु आयुक्तासह इतर जबाबदार अधिकारी दालनात उपलब्ध नसल्याचे दिसून आले. यामुळे संतप्त महिलांनी महानगरपालिकेचे मुख्य प्रवेशद्वाराला कूलूप ठोकून आंदोलन केले. महिलांनी प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आणि त्यांच्या समस्या समाधान करण्याची मागणी केली.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.