जळगाव लाईव्ह न्यूज । २ जानेवारी २०२२ । गेल्या काही दिवसापासून बदलत्या हवामानामुळे तापमान चढ-उतार दिसून आला. पुढील चार दिवसांत हवामान काेरडे राहणार असून दिवसा कमाल तापमान तब्बल ३२ अंशांपर्यंत जाणार असल्याने उन्हाचा चटका जाणवेल. तर किमान तापमानदेखील १७ अंशांपर्यंत वाढणार असल्याने थंडीची तीव्रता कमी असणार आहे.

गेल्या आठवड्यात उत्तरेतील थंडीच्या लाटेमुळे गारठा वाढला हाेता. अवकाळी पाऊस, गारपीट आणि ढगाळ वातावरणात धुक्यासाेबत थंडीही वाढली हाेती. वाऱ्याचा वेग वाढल्याने ढगाळ वातावरणात दिवसाचा गारठाही वाढला हाेता; परंतु १ जानेवारीपासून ढगाळ वातावरण काहीसे निवळल्याने सकाळपासून उन्हाची तीव्रता वाढली हाेती.

तापमान २६ अंश सेल्सिअसपर्यंत वाढल्याने दुपारी गारठा जाणवला नाही. येत्या चार दिवसांमध्ये कमाल अाणि किमान तापमानात वाढ हाेणार आहे. कमाल तापमान ३२ अंशांपर्यंत तर किमान तापमान १७ अंशांपर्यंत वाढणार असल्याने थंडीची तीव्रता कमी असेल, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

हे देखील वाचा :
- वर्षाचा शेवटचा दिवस १२ राशींच्या लोकांसाठी कसा जाईल? वाचा ३१ डिसेंबरचे राशिभविष्य
- जळगाव मनपा निवडणूक : प्रभाग ६ अ मधून हेतल पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल
- जळगाव महापालिकेसाठी महायुतीकडून उमेदवारांची यादी जाहीर; वाचा प्रभागनिहाय उमेदवाराचे नाव?
- मोठी बातमी! राज्यातील या १४ महापालिकेत भाजप- शिवसेनेची युती तुटली
- प्रवाशांनो लक्ष द्या ! १ जानेवारीपासून रेल्वेच्या वेळापत्रकात बदल, भुसावळमार्गे धावणाऱ्या या गाड्यांचा समावेश







