जळगाव लाईव्ह न्यूज । १७ डिसेंबर २०२१ । पाळधी ( ता.धरणगाव ) येथून जवळच असलेल्या सावदे रस्त्यावरील एका शेतात चोर वाहन लावून बांधलेल्या बैल चोरीचा प्रयत्न करत असल्याचे निदर्शनास आले.पोलिसांनी धडक कारवाईत एका संशयितास ताब्यात घेतले.असून,दोन संशयित पसार झाले आहेत.
सविस्तर असे की,धरणगाव तालुक्यातील पाळधी येथून जवळच असलेल्या सावदे रस्त्यावरील एका शेतात बैल चोरीच्या चोरांनी मालवाहतुकीचे वाहन (क्रमांक एम. एच. १९-१०९७) शेतात लावले. राजू भालेराव यांच्या शेतात बांधलेल्या बैल चोरीचा प्रयत्न करत असताना परिसरातील शेतकऱ्याने भालेराव यांना मोबाइलवर कळविले. तातडीने भालेराव हे शेताच्या दिशेने धावले. घटनेची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी एका संशयितासह वाहन ताब्यात घेतले. दोन संशयित पसार झाले आहेत. तपास पाळधी दूरक्षेत्र पोलिस ठाण्याचे एपीआय गणेश बुवा यांचा मार्गदर्शनाखाली पोलिस अरुण निकुंभ करीत आहेत.