Jalgaon : हातभट्टी दारू तयार करण्यासाठी लागणारे टाक्या-चुली जेसीबीद्वारे केले नष्ट

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ ऑगस्ट २०२३ । जळगाव तालुक्यातील भोलाणे, देऊळवाडे परिसरात गावठी हातभट्टी दारु बनविण्यासाठी तयार केलेले भूमिगूत सिमेंटचे हौद जेसीबीच्या सहाय्याने नष्ट करण्यात आले.या ठिकाणाहून दोन लाख ८० हजार रुपये किमतीचे १४ हजार लिटर रसायन नष्ट करण्यात आले. या प्रकरणी पाच गुन्हे दाखल करण्यात आले.
दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील गावठी हातभट्टी दारुची निर्मिती, विक्रीला आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क, पोलिस व महसूल प्रशासनाच्यावतीने संयुक्त मोहीम राबविली जात आहे. याच पार्श्वभूमीवर भोलाणे, देऊळवाडे मध्ये गावठी हातभट्टी दारू तयार करण्यासाठी लागणारे गूळ, नवसागर मिश्रित असलेले कच्चे रसायन तयार करणे व साठविण्यासाठी जमिनीत सिमेंट कॉन्क्रीटने तयार केलेल्या टाक्या भूमीगत पद्धतीने बांधलेल्या होत्या. त्या टाक्या व परिसरात असलेल्य चुली पथकाने जेसीबीच्या सहाय्याने उध्वस्त केल्या. या ठिकाणाहून दोन लाख ८० हजार रुपये किमतीचे १४ हजार लिटर रसायन नष्ट करण्यात आले. या प्रकरणी पाच गुन्हे दाखल करण्यात आले.
यांनी केली कारवाई :
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक लीलाधर पाटील, चंद्रकांत पाटील, दुय्यम निरीक्षक सी.आर. शिंदे, एस.बी. भगत, जी.सी. कंखरे, सुरेश मोरे, तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक गणेश सायकर, पी.पी. तायडे, गोकुळ अहिरे, व्ही.टी.हटकर, दिनेश पाटील, धनसिंग पावरा, सत्यम माळी, पी.एस. भामरे, मनोज मोहिते, पोहेकॉ. सुधाकर शिंदे, बापू कोळी, गजानन पाटील तसेच भोलाणे तलाठी राहुल अहिरे व पोलिस पाटील रवींद्र सपकाळे, देऊळवाडे तलाठी मनोहर बाविस्कर यांनी ही कारवाई केली.