जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरातील नामांकित हॉटेल आणि लॉजिंगच्या ८ लाख १४ हजारांचा नोकरानेच अपहार केल्याप्रकरणी संशयित नोकराला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला ४ दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
जयंत रामदास पेठकर यांच्या फिर्यादीनुसार त्यांचे मालकांचे रेल्वे स्टेशन परिसरात हॉटेल सिल्व्हर पॅलेस नावाचे नामांकित हॉटेल आहे. एप्रिल २०२४ पासून हॉटेलच्या सर्व व्यवहारांची तपासणी केली असता दर महिन्याला काही काही दिवसांनी थोडी थोडी रक्कम कमी असल्याचे निदर्शनास आले. आदित्य सुनील वाघ रा.कानळदा रोड याने या कालावधीत नोकर या नात्याने त्याच्याकडे विश्वासाने दिलेली ८ लाख १४ हजारांची रक्कम योगेश महाशब्दे, हर्षल बागुल यांच्याकडे जमा न करत अपहार केला. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
शहर पोलिसांनी आदित्य सुनील वाघ याला अटक करून शुक्रवारी न्या.देशमुख यांच्या न्यायालयात हजर केले असता रक्कम हस्तगत करणे, गुन्ह्यातील सहभाग तपासणे आणि पुढील तपासकामी त्याला दि.६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. फिर्यादीतर्फे अँड.रोहन बाहेती यांनी काम पाहिले. गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा करीत आहेत.