⁠ 
रविवार, मे 5, 2024

औषधांचा साठा सांगत होत होती दारूची तस्करी अन्.. !

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ मे २०२३ । गुजरात राज्यात दारूवर प्रतिबंध आहे. मात्र या न त्या मार्गाने गुजरातमध्ये दारू पोहोचत असतेच.याच बरोबर चढ्या दामाने दारूची विक्री होत असते. पर्यायी महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी दारूची वाहतूक केली जात असते.मात्र अश्याच एका वाहतुकीला रोखण्यात पोलिसांना यश आले आहे,

नवापूर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे कंटेनरमधून 46 लाखांचा मद्यसाठा जप्त करीत चालकास अटक केली आहे. संशयितांनी कंटेनरमध्ये औषधांचा साठा असल्याची सुरूवातीला बतावणी केली मात्र पोलिसांनी वाहनाची तपासणी केल्यानंतर पथकालाही धक्का बसला. 46 लाख पाच हजार 320 रुपयांचा विदेशी दारूचा साठा जप्त केल्याप्रकरणी विसरवाडी पोलीस ठाण्यात कंटेनर चालक प्रकाश नरसिंगराम देवासी (20, गंगाणी, ता.बावडी, जि.जोधपूर) राजस्थान याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

\सोमवार, 15 मे 2023 रोजी रात्री धुळ्याकडून विसरवाडी, नवापूरमार्गे महाराष्ट्र राज्यातून गुजरात राज्यात अशोक लेलँड कंपनीच्या कंटेनरमधून अवैध दारुची चोरटी वाहतूक होणार आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांना मिळाल्यानंतर त्यांनी नवापूर पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांना पथक तयार करण्याचे आदेश दिले. पथकांनी विसरवाडी पोलीस ठाणे हद्दीतील सुरत ते धुळे राष्ट्रीय महामार्गावरील महालक्ष्मी हॉटेलजवळ सापळा रचला.

कंटेनर के.ए.51 बी.9974 हा सोमवारी रात्री 10 वाजता आल्यानंतर त्याची तपासणी केली असता त्यात देशी-विदेशी दारूचे बनावट व्हिस्कीचे बॉक्स आढळल्याने ते जप्त करण्यात आले. पोलीस उपअधीक्षक सचिन हिरे यांनी भेट देत माहिती जाणून घेतली.