⁠ 
शुक्रवार, मे 17, 2024

शेअर बाजारातील घसरणीला अखेर ‘ब्रेक’ ; आज सेन्सेक्ससह निफ्टी वाधरली

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जून २०२२ । मागील काही गेल्या काही दिवसापासून शेअर बाजारात घसरण दिसून आले. या आठवड्याच्या पहिल्याच दिवसापासून शेअर बाजारात सलग तीन दिवस घसरला आहे. मात्र आज गुरुवारी या घसरणीला ब्रेक लागला आहे. सेन्सेक्स 427.79 अंकांनी वाढून 55,320.28 वर पोहोचला. तर त्याच वेळी निफ्टी देखील 121.85 अंकांच्या वाढीसह 16,478.10 वर बंद झाला.

जागतिक स्तरावर कमकुवत कल असतानाही रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL) आणि टेक महिंद्रा यांसारख्या बड्या कंपन्यांच्या समभागांच्या खरेदीमुळे शेअर बाजार गुरुवारी बंद झाला. यासह देशांतर्गत शेअर बाजारातील गेल्या चार व्यवहार सत्रातील घसरणीचा ट्रेंडही संपुष्टात आला. सेन्सेक्स कंपन्यांमध्ये डॉ. रेड्डी यांचा शेअर सर्वाधिक ३ टक्क्यांनी वाढला. रिलायन्स इंडस्ट्रीज, भारती एअरटेल, टेक महिंद्रा, सन फार्मा आणि कोटक महिंद्रा बँकेचे समभागही वाढीसह बंद झाले.

एनटीपीसी आणि एसबीआयचे शेअर घसरले
टाटा स्टील, एनटीपीसी, एसबीआय आणि बजाज फायनान्सच्या समभागांनी घसरण नोंदवली. इतर आशियाई बाजारांमध्ये, चीनचा शांघाय कंपोझिट, हाँगकाँगचा हँग सेंग आणि दक्षिण कोरियाचा कोस्पी लाल रंगात होता, तर जपानचा निक्केई वर होता.

युरोपातील प्रमुख बाजारपेठांमध्ये दुपारच्या व्यवहारात घसरणीचा कल दिसून आला. दरम्यान, आंतरराष्ट्रीय तेल बेंचमार्क ब्रेंट क्रूड 0.13 टक्क्यांनी घसरून $123.42 प्रति बॅरलवर आले. स्टॉक एक्स्चेंजच्या आकडेवारीनुसार विदेशी संस्थागत गुंतवणूकदार निव्वळ विक्री करणारे होते. बुधवारी त्यांनी 2,484.25 कोटी रुपयांचे शेअर्स विकले.