जळगाव जिल्हा
बापरे ! धावत्या डंपरचे झाले दोन तुकडे
जळगाव लाईव्ह न्यूज । १ एप्रिल २०२४ । जळगाव जिल्ह्यात अवैध वाळू जोरात सुरु आहे. कारवाई करूनही चोरी छुपे मोठ्या प्रमाणात अवैध वाळू वाहतूक सुरु असल्याचं दिसून येत आहे. याच दरम्यान, यावल फैजपूर रोडवर सुसाट वेगाने धावणाऱ्या अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या डंपरचे अचानक दोन तुकडे झाले.
सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाही. ही घटना ३१ मार्च रोजी पहाटे ३ ते ४ वाजेच्या सुमारास यावल फैजपूर रोडवरील चितोडा गावाजवळ घडली. या घटनेनंतर डंपर चालकाने घटनास्थळावरून पळ काढला.
दरम्यान, हे डंपर जीर्ण झाल्याने अचानक धावताना या डंपरची चेचीस तुटून दोन तुकडे झाले असावे असा अंदाज आहे. यामुळे जुनी वाहने व योग्य स्थिती नसलेली वाहने वापरात असेल तर, कडक करवाई करणे गरजेचे असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले. या अपघाताबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.