जळगाव जिल्हा

प्रवाशांनी भरलेल्या धावत्या जळगाव-बांबरुड बसचा रॉड तुटला अन्..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ ऑगस्ट २०२३ । राज्य परिवहन महामंडळाच्या अनेक बसेसची दुरावस्था झालेली असून बसेला होणाऱ्या अपघाताचेही प्रमाण वाढत दिसत आहे. यातच ५० प्रवासी घेऊन जाणाऱ्या जळगाव-बांबरुड बसचा रॉड तुटल्याने अपघात झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. मात्र चालक हेमंत पाटील यांनी सतर्कता दाखवत बस रस्त्याच्या एका बाजूला सुरक्षितपणे उभी करण्यास यश मिळविल्याने अनर्थ टळला.

दरम्यान, बस चालक आमच्यासाठी देवदूत ठरल्याची प्रतिक्रिया यावेळी प्रवाशांनी व्यक्त केली. मात्र दुसरीकडे बस मागितल्याचा रागातून एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने चालकासह प्रवाशांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप प्रवाशांनी केला असून या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

जळगाव ते पाचोरा तालुक्यातील बांबरुड गावाला जाण्यासाठी सायंकाळच्या सुमारास जळगाव बसस्थानकातून जळगाव डेपोची बस निघाली होती. या बसने जळगाव सोडल्यानंतर प्रवासात शिरसोली गावाजवळ बसच्या पुढील चाकाजवळचा रॉड तुटल्याने बस खाली झुकली. यातच चालकाचे स्टेरींगवरील नियंत्रण सुटले. मात्र, यानंतरही समयसूचकता दाखवत अनुभवी असलेल्या चालक हेमंत पाटील यांनी बस कशी तरी रस्त्याचा कडेला लावण्यात यश मिळविले. त्यामुळे अपघात होवून मोठा अनर्थ टळला.

चालक हेमंत पाटी यांनी सतर्कता दाखवित बस थांबविली अन्यथा आमच्यासोबत काय घडले असते, घरी लहान लहान मुले होती, अस म्हणत बस मधील प्रवाशांनी चालक पाटील हे आमच्या साठी देवदुत ठरल्याच्या प्रतिक्रिया दिल्या. यावेळी चालक हेमंत पाटील यांचे दाखविलेल्या सतर्कबद्दल प्रवाशांनी टाळ्या वाजवून तसेच त्यांना श्रीफळ देवून त्यांचे स्वागत तसेच सत्कार केला.

या घटनेनंतर एस.टी मंडळाकडून दुसरी बस उपलब्ध करून देण्यात आली. मात्र, ती देखील काही अंतर गेल्यावर खराब झाल्याने प्रवाशांनी आणखीनच संताप व्यक्त केला. एस टी मंडळ प्रवाशांच्या जीवाशी खेळ करत असल्याचा आरोप यावेळी बसमधील प्रवाशी महिलांनी करत मुख्यमंत्र्यांनी याकडे आणि अरेरावी करणाऱ्या अधिकाऱ्याकडे जातीने लक्ष घालून त्यांना ठिकाणावर आणावे. नाही तर आम्हीच त्याला ठिकाणावर आणनार असल्याची भूमिका प्रवाशी महिलांनी जाहीर केली आहे. शिवीगाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button