⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

मनपाच्या सार्वजनिक बांधकाम विभागात पुन्हा खांदेपालट !

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ एप्रिल २०२३ ।  महानगरपालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागात पुन्हा खांदेपालट करण्यात आली आहे. सहा अभियंत्यांच्या कार्यक्षेत्रात बदल करत अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली आहे. कमी मनुष्यबळाअभावी बांधकाम विभागात अभियंत्यांकडे आता तीन ते चार प्रभागांची जबाबदारी दिली.

मनपा आयुक्त विद्या गायकवाड यांनी या संदर्भात आदेश जारी केले आहेत. यात तीन ते चार महिन्यांपूर्वी बांधकाम विभागातून नगररचना विभागात बदली करण्यात आलेले शाखा अभियंता नरेंद्र जावळे यांची जळगाव पुन्हा बांधकाम विभागात नियुक्ती करण्यात आली. त्यांच्याकडे आता प्रभाग १,२ व ३ ची जबाबदारी दिली आहे. कनिष्ठ अभियंता योगेश वाणी यांच्याकडे घनकचरा व्यवस्थापन, पर्यावरण व बांधकामकडील प्रभाग ७ व ८ ची जबाबदारी दिली आहे.

जितेंद्र रंधे यांची पाणीपुरवठा विभागात नियुक्ती केली. तसेच आर. टी. पाटील यांच्याकंडे प्रभाग क्रमांक १२, १३ व १४ याशिवाय नगरचना विभागात खेडी शिवार जबाबदारी सोपवली आहे. प्रकाश पाटील यांच्याकडे प्रभाग क्रमांक ६, १६ व १७ तसेच मनोज वन्नेरे यांच्याकडे प्रभाग ९, १० व ११ची जबाबदारी सोपवली आहे.