---Advertisement---
राजकारण जळगाव जिल्हा धरणगाव महाराष्ट्र

धरणगावात गुलाबराव पाटील व अब्दुल सत्तार यांच्या फोटोला मारले जोडे

---Advertisement---

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून पोलिसांना निवेदन सादर

Dharangaon News । जळगाव लाईव्ह न्यूज । जयेश महाजन । राज्याचे पाणी पुरवठा तथा स्वच्छ्ता मंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर व कृषिमंत्री अब्दुल सत्तार, यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल अशलाघ्य शब्दात वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. याच्या निषेधार्थ आज धरणगावात छत्रपती शिवरायांच्या स्मारकाजवळ शिवसेना (उबाठा) पक्षाकडून दोघंही मंत्र्यांचा प्रतीकात्मक छायाचित्राला जोडे मार आंदोलन करून निषेध नोंदविण्यात आला.

IMG 20221109 WA0007 jpg webp webp

आंदोलनानंतर धरणगाव पोलिसात निवेदन सादर करण्यात आले. प्रसंगी कार्यकर्त्यांनी मंत्री गुलाबराव पाटील व मंत्री सत्तार शेख यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
यावेळी शिवसेना सह संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, युवा सेना जिल्हा प्रमुख निलेश चौधरी, उपजिल्हा प्रमुख ॲड. शरद माळी, जि.प.सदस्य जानकीराम पाटील, मा.पं.स. सभापती दीपक सोनवणे, रमेश पाटील, राजेंद्र ठाकरे, युवासेना उपजिल्हा प्रमुख योगेश वाघ, शहर प्रमुख धीरेंद्र पूरभे यांची प्रमुख उपस्थिती होती.

---Advertisement---

तसेच भागवत चौधरी, संतोष सोनवणे, विनोद रोकडे, गणेश माळी, भाऊसाहेब सोनवणे, रविंद्र जाधव, जितेंद्र धनगर, उप तालुका भरत महाजन, बापू महाजन, गोपाळ पाटील, भीमराव धनगर, राहुल रोकडे, गणेश महाजन, यांच्यासह मा. नगराध्यक्षा उषाताई वाघ, नगरसेविका कीर्ती मराठे, हेमांगी अग्निहोत्री, सुनीता चौधरी, गिता योगेश वाघ, असंख्य शिवसैनिकांसह आदी पदाधिकारी उपस्थित आहेत.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---