---Advertisement---
जळगाव जिल्हा महाराष्ट्र राजकारण

शरद पवार गटाच्या 6 जागा निश्चित ; रावेरमधून एकनाथ खडसे किंवा रोहिणी खडसे लढणार

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ मार्च २०२४ । आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. अद्याप राज्यातील महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. मात्र अशातच लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सहा जागा जवळपास निश्चित झाल्या आहेत. विशेष रावेर लोकसभा मतदारसंघ शरद पवार गटाच्या वाट्याला सुटला असून येथून एकनाथ खडसे किंवा रोहिणी खडसे यांना उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे

eknath khadse rohini khadse sharad pawar jpg webp

लोकसभा निवडणूक कार्यक्रम लवकरच जाहीर होणार आहे. मात्र महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. त्यात वंचित बहुजन आघाडी आपल्या प्रस्तावावर अडून बसली आहे. त्यामुळे मविआच्या जागा वाटपाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं असताना शरद पवार यांनी यावर भाष्य केलं होतं. त्यानंतर शरद पवार गटाची सहा जागांवरील संभाव्य नावे समोर आली आहेत.

---Advertisement---

रावेर लोकसभा मतदारसंघ शरद पवार गटाच्या वाट्याला सुटला आहे. त्यामुळे येथून एकनाथ खडसे किंवा त्यांची कन्या रोहिणी खडसे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. भाजपने रावेरमधून सध्याच्या विद्यमान खासदार रक्षा खडसेंना तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर केली. यातच शरद पवार गटाकडून त्यांच्या विरोधात स्वत: एकनाथ खडसे किंवा त्यांची मुलगी रोहिणी खडसे उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. यामुळे रावेरमध्ये सासरे विरुद्ध सून किंवा नणंद विरुद्ध भावजय अशी लढत रंगणार आहे.

शरद पवार गटाच्या सहा मतदारसंघातील संभाव्य उमेदवारांची नावे
शरद पवार गटाच्या सहा मतदारसंघातील संभाव्य उमेदवारांची नावे समोर आली आहेत. त्यामध्ये बारामतीतून सुप्रिया सुळे, शिरूरमधून अमोल कोल्हे, रावेर – एकनाथ खडसे किंवा रोहिणी खडसे, सातारा – श्रीनिवास किंवा बाळासाहेब पाटील आणि नगर दक्षिणमधून निलेश लंके यांचा समावेश आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---