⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | मान्सून दाखल होताच महाराष्ट्रात पुढील पाच दिवस मुसळधारचा इशारा ; IMD कडून अलर्ट जारी

मान्सून दाखल होताच महाराष्ट्रात पुढील पाच दिवस मुसळधारचा इशारा ; IMD कडून अलर्ट जारी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जून २०२४ । सर्वसामान्य आणि शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला असल्याची घोषणा हवामान खात्याकडून करण्यात आली आहे. रत्नागिरी आणि सोलापूरपर्यंत मान्सूनचे आगमन झाले असून येत्या तीन, चार दिवसांत मुंबईसह महाराष्ट्राच्या आणखी भागात मान्सून दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. दरम्यान, मान्सून दाखल होताच आयएमडीने राज्यात पुढील पाच दिवस विविध भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे.

हवामान विभागाने 10 जूनपर्यंत महाराष्ट्रात पोहोचेल, असा अंदाज वर्तवला होता. मात्र आता तो वेळेआधीच महाराष्ट्रात पोहोचला आहे. यानंतर आता राज्यात पुढील पाच दिवस विविध भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे. यादरम्यान काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (50-60 किमी प्रतितास वेग) आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हवामान खात्याने जाहीर केलेल्या अंदाजानुसार, आज ६ जून रोजी जळगाव, धुळे, नंदुरबार आणि पालघर वगळता संपुन महाराष्ट्रात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. तर उद्या ७ जून रोजी नंदुरबार जिल्हा वगळता संपूर्ण महाराष्ट्राला पावसाचा येलो अलर्ट दिला आहे. तसेच आठ जून रोजी संपूर्ण राज्याला पावसाचा येलो देण्यात आहे.

तर ९ जून रोजी नंदुरबार, धुळे, जळगाव, जालना, लातूर, नांदेड, हिंगोली, या जिल्ह्याना वगळून इतर जिल्ह्यात पावसाचा येलो जारी करण्यात आला आहे. तर १० जून रोजी नंदुरबार, जळगाव, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर या जिल्ह्यांना वगळून इतर जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आला

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.