---Advertisement---
जळगाव जिल्हा हवामान

जळगाव तापले ! राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद, वाचा आजचे दिवसभरातील तापमान

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ एप्रिल २०२२ । ढगाळ वातावरणामुळे काही दिवसापूर्वी जळगाव जिल्ह्यातील उन्हाचा पारा २ ते ३ अंशांची घसरून ४० अंशावर आला होता. मात्र काल शनिवारी राज्यातील सर्वाधिक ४४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद जळगावला करण्यात आली. आज सकाळी १० वाजेला तापमानाचा पारा ३८ अंशावर होता. तर तो दुपारनंतर ४३ अंशापुढे जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्यातील काही भागात बेमोसमी पावसाचाही अंदाज हवामान विभागाने वर्तवला असून नागरिकांना उन्हाच्या चटक्यासोबतच उकाडाही सहन करावा लागत आहे.

tapman 4

हवामान विभागाकडून राज्यभरात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्यानुसार २१ रोजी जिल्ह्यात ढगाळ वातावरणामुळे तापमानाचा पारा २ ते ३ अंशाने घसरून ४० वर आला होता. त्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र त्यानंतर वातावरण निरभ्र झाल्याने पुन्हा तापमान वाढू लागले. शुक्रवारी जळगाव जिल्हयातील तापमान ४२ अंशावर होता. तर काल शनिवारी सर्वाधिक ४४ अंश तापमानाची नोंद झाली आहे. यापूर्वी जिल्ह्यात ६ एप्रिल रोजी यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक ४४.८ तापमान नोंदवले गेले.

---Advertisement---

दरम्यान, येत्या २७ एप्रिलपर्यंत मध्य महाराष्ट्रात विजांचा कडकडाट, साेसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस हाेईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी शनिवारी पावसाच्या सरी काेसळल्या.

जळगावातील आजचे दिवसभरातील तापमान (Jalgaon Temperature) असे?
वेळ – अंश
१० वाजेला – ३८ अंश
११ वाजेला – ३९ अंश
१२ वाजेला – ४१ अंश
१ वाजेला- ४२ अंशापुढे
२ वाजेला – ४२ अंशापुढे
३ वाजेला – ४३ अंशापुढे
४ वाजेला – ४३ अंश
५ वाजेला – ४२ अंश
६ वाजेला – ३८ अंश
७ वाजेला – ३६ अंश
आणि रात्री ८ वाजेला ३५ अंशावर स्थिरावणार.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---