‘या’ आहेत देशातील सर्वात मायलेज देणाऱ्या बाइक्स, किमतीही आहे खूपच कमी?
जळगाव लाईव्ह न्युज । १४ जुलै २०२२ । वाढत्या इंधनच्या महागाईत वाहन चालविणे जिकरीचे झाले आहे. मात्र, वाढत्या पेट्रोलच्या किमतींमध्ये 110KM पर्यंत मायलेज देणारी बाईक तुमच्याकडे असेल तर तुम्हाला किती बरे वाटेल याची कल्पना करा. मात्र, हे वाचून तुम्हाला वाटले असेल की एवढ्या मोठ्या प्रमाणात मायलेज देणारी अशी बाइक कधीच नसेल. पण तसे नाही. आज आम्ही तुम्हाला देशातील सर्वात मायलेज देणा-या काही बाईकबद्दल सांगणार आहोत, त्यापैकी दोन बाईक 100Km पेक्षा जास्त मायलेज देऊ शकतात असा दावा केला जात आहे. यापैकी एक 110Km मायलेज देखील देऊ शकतो.
TVS स्पोर्ट (एक्स-शोरूम किंमत रु. 60,000 पासून सुरू होते)
TVS स्पोर्टची किंमत 60 हजार रुपयांपासून सुरू होते तर ऑन रोड 72,434 रुपयापर्यंत जाते. ही कंपनीच्या सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या बाइक्सपैकी एक आहे. यात 109cc इंजिन आहे, जे 8.18bhp कमाल पॉवर जनरेट करण्यास सक्षम आहे. त्याची देखभाल खर्च कमी आहे. TVS वेबसाइटवर सूचीबद्ध केलेल्या काही पुनरावलोकनांनुसार, ही बाईक 110km पर्यंत मायलेज देऊ शकते.
Hero HF DELUXE (एक्स-शोरूम किंमत रु. 64000 पासून सुरू होते)
Hero HF DELUXE ची किंमत 64000 रुपयांपासून सुरू होते आणि on road 72,685 रुपयांपर्यंत जाते. यात 97.2cc इंजिन आहे, जे 5.9kw पॉवर आणि 8.5Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. कंपनीच्या वेबसाईटवर एका ग्राहकाचा हवाला देत लिहिले आहे की, ही बाईक 100km पेक्षा जास्त मायलेज देऊ शकते.
बजाज प्लॅटिना 100 (एक्स-शोरूम किंमत रु.62 हजार पासून सुरू होते)
बजाज प्लॅटिना 100 मध्ये 102 cc 4-स्ट्रोक, DTS-i, सिंगल सिलेंडर इंजिन आहे जे 5.8 kW कमाल पॉवर आणि 8.3 Nm पीक टॉर्क जनरेट करू शकते. हे 4-स्पीड गिअरबॉक्ससह येते. बाइकचा टॉप स्पीड 90 Kmph आहे आणि 70KM पेक्षा जास्त मायलेज देण्यास ती सक्षम आहे.
बजाज CT110X (एक्स-शोरूम किंमत रु. 61 हजार पासून सुरू होते)
बजाज CT110X मध्ये 115.45cc 4-स्ट्रोक, सिंगल-सिलेंडर इंजिन आहे, जे 8.6 PS कमाल पॉवर आणि 9.81 Nm पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. यात 4-स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे. त्याचे मायलेजही ७० किमीपेक्षा जास्त आहे.