⁠ 
मंगळवार, जानेवारी 7, 2025
Home | जळगाव जिल्हा | अमळनेर | तरुणाचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आल्याने खळबळ

तरुणाचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आल्याने खळबळ

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ०२ जून २०२१ । पोलीस स्टेशन हदीतील अमळनेर ते टाकरखेडा रोड लगत असलेल्या अमळनेर शेत शिवारातील फॉरेस्ट कम्पार्टमेंट ३८८ मधील काटेरी झुडपात एका तरुणाचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

याबाबत अमळनेर शेत शिवारातील फॉरेस्ट कम्पार्टमेंट ३८८ मधील काटेरी झुडपात दिनांक ३१/०५/२०२१ रोजी सकाळी १०.०० ते दिनांक ०२/०६/२०२१ रोजी सकाळी १०.०० वाजेच्या दरम्यान एका ३० वर्षीय पुरुष जातीचा मृतदेह आढळून आला आहे. हा घातपाताची शक्यता वर्तविण्यात येत आहे,

सदर प्रेत अर्थवट जळालेल्या तसेच कुजलेल्या स्थीतीत मिळुन आले असून या बाबत गणेश आत्माराम पाटील धंदा मजुरी रा.पळासदळे ता.अमळनेर यानी फिर्याद दिले वरून अमळनेर पोलीस स्टेशनला भाग ५ गुरन ३३/२०२१ भादवि कलम ३०२,२०१प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्हयाचा तपास जयपाल हिरे, पोलीस निरीक्षक हे करीत आहेत. घटनास्थळावर  सचिन गोरे(अपर पोलीस अधिक्षक चाळीसगाव), राकेश जाधव (उपविभागीय पोलीस अधिकारी अमळनेर) जयपाल हिरे (पोलीस निरीक्षक),राकेश परदेशी, (सपोनि), राहुल लबडे (पोउपनि) यानी भेट दिली आहे.

यातील मयताचे अगांवर अर्धवट जळालेली काळ्या रंगाची जिन्स पॅन्ट,लाल रंगाची अंडरवेअर अर्धवट जळालेली मिळुन आली. मयताचे उजवे हाताचे कामेवर ॐ.दि.क.श.आ.वि. असे गोंदलेले असुन मयताची नमुद वर्णनावरून ओळख पटल्यास तसेच मयताचे मारेकरी बाबत माहीती मिळुन आल्यास अमळनेर पोलीस स्टेशनला(०२५८७-२२२३३३) संपर्क करण्याचे आवाहन केले आहे. माहीती देणाराची नाव व गाव गोपणीय ठेवले जाईल व त्यास योग्य ते बक्षिस दिले जाईल.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.