---Advertisement---
जळगाव जिल्हा भडगाव

त्या जिनींग मालकाचा अर्ज कोर्टाने फेटाळला

court
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ०३ डिसेंबर २०२१ । पासर्डी ( ता. भडगाव ) येथील १४ शेतकर्‍यांची तब्बल १ कोटी ४१ लाख रूपयांची फसवणूक करणार्‍या जामी मालकाचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळून लावला आहे.

court

सविस्तर असे की, तालुक्यातील पासर्डी येथील मातोश्री जिनिंग मालकाने १४ शेतकर्‍यांची १ कोटी ४१ लाख ९५० रुपयांत फसवणूक केल्या प्रकरणी येथील पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी संशयित आरोपी अजय रामेश्वर समदानी यांनी कोर्टात जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता. मात्र तो न्यायालयाने नामंजूर केला.

---Advertisement---

जामीन प्रकरणी सरकारी वकील व्ही.डी. मोतीवाले यांनी मुद्देसूद युक्तिवाद केला. तसेच गुन्ह्याचे तपासाधिकारी पोलिस उपनिरीक्षक संदीप पाटील यांनीही त्यांचे म्हणणे दाखल केल्याने न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज नामंजूर केला. दरम्यान, या प्रकरणात आता पुढे काय होणार याकडे परिसरातील शेतकर्‍यांचे लक्ष लागून आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---