---Advertisement---
जळगाव शहर

मैत्री अर्ध्यातच तुटली.. जळगावात तरुणाला ट्रकने चिरडले, एक गंभीर

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ ऑक्टोबर २०२१ । शहरातील खड्ड्यांचे आणि खराब रस्त्यांचे बळी नेहमीच जात आहेत. शुक्रवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास मित्रासोबत शहरात येत असतांना दुचाकी घसरून पडलेल्या तरूणाच्या अंगावर ट्रक गेल्याने दुचाकीस्वार तरूण जागीच ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. अपघातात सौरभ बनवारीलाल तिवारी (वय-२२) रा. महाविर नगर हा तरुण जागीच ठार झाला तर लीलाधर संजय कोळी हा गंभीर जखमी झाला आहे. अपघात गणेश कॉलनीतील गोकुळ स्वीट मार्टजवळ घडली.

Accident student jpg webp

महावीर नगरात राहणाऱ्या सौरभ तिवारी यांचे गांधी मार्केटमध्ये शुजचे दुकान आहे. कुटुंबातील कर्ता असल्याने तो लहान वयात देखील काम करून कुटुंबाला हातभार लावत होता. शुक्रवारी दुपारी १२.३० च्या सुमारास चुलत भावाला दुकानावर बसवून मु.जे. महाविद्यालय परिसारात जातो असे सांगून जिवलग मित्र लिलाधर संजय काळे रा.कांचन नगर यासोबत तो दुचाकी क्रमांक एमपी.३७.एमएल.९३८३ ने जात होता. रिंगरोडकडून नूतन मराठा महाविद्यालयाकडे जात असताना ट्राफिक गार्डन ते गोकुळ स्वीट मार्ट दरम्यान एका इमारतीजवळ अचानक दुचाकी घसरल्याने तो ट्रक क्रमांक एमएच.३१.सीबी.०७९८ च्या पुढील चाकाखाली आला.

---Advertisement---

ट्रक चाकाखाली आल्याने सौरभचा जागीच मृत्यू झाला तर लिलाधर काळे हा गंभीर जखमी झाला आहे. घटनेनंतर लागलीच तरुणांनी जखमी लीलाधरला रिक्षाने रुग्णालयात दाखल केले. अपघातानंतर ट्रक चालकाने लागलीच पळ काढला. अपघात झाल्यानंतर ट्रक जिल्हपेठ पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला. अपघाताची माहिती कळताच नातेवाईकांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात धाव घेतली. मुलाचा मृतदेह पाहून सौरभच्या आईसह नातेवाईकांनी एकच आक्रोश केला.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---