⁠ 
गुरूवार, जुलै 25, 2024

WhatsAppची ‘ही’ मोफत मिळणारी सेवा बंद होणार? युझर्सला मोजावे लागणार पैसे

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जानेवारी २०२४ । जगभरात WhatsApp चे कोट्यवधी युझर्स असून या यूजर्ससाठी एक महत्त्वाची बातमी आहे. या वर्षापासून, वापरकर्त्यांसाठी उपलब्ध असलेली मोफत सेवा संपुष्टात येऊ शकते. गुगलने यापूर्वीच याबाबतचे संकेत दिले आहेत. खरंतर, WhatsApp वरील बहुतेक वापरकर्ते त्यांच्या चॅटचा बॅकअप क्लाउड स्टोरेजवर सेव्ह करतात, जे पूर्णपणे मोफत आहे. आता या वर्षापासून ही सेवा मोफत मिळणार नाही. त्यासाठी युझर्सला यावर्षात पैसे मोजावे लागू शकतात.याविषयीचा निर्णय अजून जाहीर करण्यात आला नाही.

वर्ष 2023 मध्ये गुगलने एक महत्वाची माहिती दिली होती. त्यामध्ये व्हॉट्सॲपमध्ये लवकरच होणाऱ्या बदलाची माहिती देण्यात आली होती. या बदलामुळे युझर्स गुगल ड्राईव्हवर मोफत मिळणारी अमर्यादीत जतन करण्याची सेवा बंद होईल. एकदा स्पेस भरल्यानंतर क्लाऊड स्टोरेजसाठी युझर्सला पेमेंट करावे लागेल. अथवा त्याचा महत्वाचा डेटा डिलिट करावा लागेल. त्यासाठी व्हॉट्सॲपने पण तयारी केली आहे.

सध्या मोफत
गुगल ड्राईव्हवर युझर्सला 15GB डेटा मोफत मिळतो. सध्या व्हॉटसॲप युझर्स त्यांना हवा तितका बॅकअप घेतले तरी त्यांना अडचण नव्हती. हा नियम यावर्षापासून बदलला आहे. पण 15GB डेटाबाबतचे धोरण कधीपासून अंमलात येईल याची अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. जो डेटा गरजेचा नाही, तो युझर्सला डिलीट करावा लागेल. तसेच बॅकअप घेताना स्मार्टनेस दाखवावी लागेल. त्याला नाहकचा डेटा डिलीट करावा लागेल. बॅकअप घेताना गरजेचा डेटा डिलीट करावा लागेल. तर त्याचे स्टोरेज लगेचच भरणार नाही.

गुगल ड्राईव्ह वर अतिरिक्त स्टोरेज एक्सेस करण्यासाठी पेमेंट करावे लागते. त्यासाठी गुगलचा वन प्लॅन आहे. युझर्स त्यांच्या गरजेनुसार स्टोरेजचा पर्याय निवडू शकतात. गुगलचा मासिक आणि वार्षिक प्लॅन आहे. या दोन्ही श्रेणीत तीन-तीन प्लॅन आहेत. मासिक बेसिक प्लॅनमध्ये 100GB डेटा मिळतो. त्यासाठी युझर्सला 35 रुपये प्रति महिना द्यावा लागतो. हा प्लॅन तीन महिन्यांसाठी आहे. त्यानंतर त्याला या सेवेसाठी 130 रुपये मोजावे लागतील.