---Advertisement---
जळगाव जिल्हा

जिल्हा वार्षिक पतयोजना 2025-26 चे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते प्रकाशन संपन्न

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्याच्या वार्षिक पतयोजना (Annual Credit Plan – ACP) 2025-26 चा शुभारंभ आज जिल्हा नियोजन भवन, येथे अग्रणी जिल्हा व्यवस्थापक (LDM) कार्यालय, जळगाव यांच्या वतीने करण्यात आला. या योजनेच्या पुस्तिकेचे प्रकाशन पालकमंत्री श्री. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झाले.

df

या प्रसंगी आमदार श्री. अमोल जवळे, आमदार श्री. अमोल पाटील, जिल्हाधिकारी म श्री. आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल करनवाल, सेंट्रल बँक ऑफ इंडिया (लीड बँक) चे प्रादेशिक प्रमुख श्री. रमेश जेठानी हे मान्यवर उपस्थित होते.

---Advertisement---

वित्तीय वर्ष 2025-26 करिता एकूण ₹18,900 कोटींच्या पतवाटपाचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले असून, त्यामध्ये ₹8,500 कोटी शेती व संबंधित उपक्रियांसाठी, ₹4,500 कोटी सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांसाठी (MSME), ₹900 कोटी इतर प्राधान्य क्षेत्रांसाठी आणि ₹5,000 कोटी अप्राधान्य क्षेत्रासाठी वाटप करण्याचे नियोजन आहे. ग्रामीण व उपनगर भागात समतोल आर्थिक विकास घडवून आणण्यासाठी उद्दिष्टित पतपुरवठा सुनिश्चित करणे, हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे. विशेषतः पीक कर्ज, कृषी यंत्रीकरण, स्वयंरोजगार योजना, बचत गट (SHG) वित्तपुरवठा आणि सूक्ष्म व लघु उद्योगांना प्रोत्साहन यावर भर दिला जाणार आहे.

मागील वर्षीच्या एसीपी 2024-25 अंतर्गत ₹17,100 कोटींच्या उद्दिष्टामधून जिल्ह्यातील बँकांनी ₹16,202.63 कोटींचे वितरण करीत 94.75 टक्के कामगिरी बजावली. यामध्ये शेतीसाठी ₹3,690.87 कोटी, एमएसएमई क्षेत्रासाठी ₹3,768.21 कोटी, गृहकर्ज, शिक्षण, नवीकरणीय ऊर्जा अशा इतर प्राधान्य क्षेत्रांसाठी ₹161.10 कोटी आणि अप्राधान्य क्षेत्रासाठी ₹4,760 कोटींचे वितरण करण्यात आले.

या वेळी श्री. सुनील कुमार दोहरे, अग्रणी जिल्हा व्यवस्थापक, जळगाव यांनी चालू वर्षासाठी निर्धारित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येतील असे सांगितले. त्यांनी पालकमंत्री, जिल्हाधिकारी, नाबार्ड व इतर मान्यवरांचे सहकार्याबद्दल आभार मानले.

या कार्यक्रमास श्री. अमित तायडे, जिल्हा विकास अधिकारी, नाबार्ड; श्री. राजू लोखंडे, प्रकल्प संचालक, सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील बँकांचे अधिकारी, जिल्हा प्रशासनाचे अधिकारी व विविध संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हा अग्रणी बँक कार्यालयाने सर्व संबंधित घटकांना या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सक्रिय सहकार्य करण्याचे आवाहन केले.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

Leave a Comment