---Advertisement---
वाणिज्य

क्रिप्टोकरन्सीचा बाजार पुन्हा गडगडला, जाणून घ्या किती टक्के झाली घट

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ डिसेंबर २०२१ । गेल्या पंधरवड्यात क्रिप्टोकरन्सीच्या बाजारात मोठी घसरण झाल्यानंतर पुन्हा सर्व डिजिटल चलन वाढले होते. शनिवारी पुन्हा एकदा क्रिप्टोकरन्सीचे मार्केट दणकून घसरले आहे. जगातील सर्वात लोकप्रिय डिजिटल चलन बिटकॉइनची किंमत सुमारे 16 टक्क्यांनी घसरली आहे, तर दुसरीकडे इथेरियम, डोजेकॉईन आणि शिबा या चलनांमध्येही मोठी घसरण झाली आहे.

crypto crash jpg webp

शनिवारी जगातील सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी असलेल्या बिटकॉइनचा व्यवहार 16 टक्क्यांनी खाली आला. विशेष म्हणजे, बिटकॉइनने या वर्षी नोव्हेंबरमध्ये आपल्या सर्वकालीन उच्चांकाला स्पर्श केला. 10 नोव्हेंबर रोजी, या डिजिटल चलनाने जबरदस्त तेजीने ६९ हजार डॉलरला स्पर्श केला. परंतु या पातळीपर्यंत पोहोचल्यापासून, तीव्र घसरण झाली आहे जी आतापर्यंत सुरू आहे.

---Advertisement---

इथरियम देखील खराब स्थितीत आहे
क्रिप्टो मार्केटमध्ये गुंतवणूकदारांचे आवडते दुसरे टॉप चलन देखील तीव्र घसरण पाहत आहे. बिटकॉइन नंतरची दुसरी सर्वात लोकप्रिय क्रिप्टोकरन्सी असलेल्या इथरियमची किंमत शनिवारी तब्बल 13.73 टक्क्यांनी घसरून 3,934.86 रुपये झाली. उल्लेखनीय म्हणजे, इथेरियमने नोव्हेंबरमध्येही त्याच्या सर्वकालीन उच्चांकाला स्पर्श केला.

इतर डिजिटल चलनांमध्ये घसरण
इतर प्रमुख डिजिटल चलनातील घसरणीची आकडेवारी पाहिल्यास, बिनान्स कॉईन 12.59 टक्के, डोजे कॉईन 19.42 टक्के, शिबा इनू 14.06 टक्के आणि लिट कॉईन 24.41 टक्क्यांनी घटले आहे. याशिवाय कार्डानो, रिपल आणि युनिस्वॅपसह इतर चलने घसरणीसह व्यवहार करत आहेत.

‘ही’ आहेत घसरणीची प्रमुख कारणे आहेत
तज्ज्ञांच्या मते, जगभरात वाढत असलेल्या कोविड-19 च्या नवीन ओमिक्रॉन प्रकाराचा प्रादुर्भाव हे त्याचे प्रमुख कारण मानले जाऊ शकते. त्याचा परिणाम जगभरातील शेअर बाजारांवर आधीच दिसून येत आहे आणि आता त्याची छाया क्रिप्टो मार्केटवरही दिसून येत आहे. क्रिप्टोकरन्सीसंदर्भातील विधेयक लवकरच भारतात आणले जाणार आहे. यासंदर्भात प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, संसदेच्या सध्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात सरकार पुढील आठवड्यात हे विधेयक मांडू शकते. हे विधेयक खाजगी क्रिप्टोकरन्सीचे व्यवस्थापन करण्याच्या उद्देशाने आणले जात आहे. देशात खाजगी क्रिप्टोकरन्सीवर बंदी घातली जाऊ शकते, असे संकेतही मिळाले आहेत.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---