---Advertisement---
जळगाव जिल्हा

पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला ; गिरणेतून आवर्तन सुटले, नागरिकांनी मानले पालकमंत्र्यांचे आभार

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ मे २०२४ । सध्या जळगाव जिल्ह्यात तापमान वाढीने कहर केला असून सोबत अनेक ठिकाणी वाढत्या तापमानात पाणीटंचाई जाणवू लागली आहे. मात्र यातच पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांच्या निर्देशानुसार काल दि. 24 रोजी सकाळी 6.00 वाजता गिरणा धरणातून पिण्याच्या पाण्याचे बिगर सिंचन पाणीवापराचे चौथे आवर्तन सोडण्यात आले. यावेळी धरणातून 2000 Cusecs (56.63 Cumecs) इतका विसर्ग गिरणा नदीपात्रात सोडण्यात आलेला आहे.

jalgaon prani prashn girna dharan jpg webp

पिण्याच्या पाण्याचे चौथे आवर्तन हे भडगाव, पाचोरा, दहिगाव बंधारा, कानळदा पर्यंत आहे. हे पाणी फक्त पिण्यासाठीचे असल्याने सर्व शेतकऱ्यांनी शेतीचे पंप बंद ठेवावे. तसेच नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे.

---Advertisement---

कानळदा व इतर परिसरातील नागरिकांना पिण्याचा पाण्यासाठी मोठा दिलासा मिळाला असल्याने नागरिकांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार मानले आहेत.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---