---Advertisement---
गुन्हे रावेर

खळबळजनक : मुलगा झाला वैरी, शेतीसाठी आईला मारण्याचा प्रयत्न

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ मे २०२१ । रावेर तालुक्यातील मोरगाव खुर्द येथे पोटाच्या मुलानेच आई शेत नावावर करून देत नसल्याने तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना आज उघडकीस आली आहे.

रावेर तालुक्यातील मोरगाव खुर्द येथील नवल पाटील हा आई सुगंधाबाई पांडुरंग पाटील वय-७० यांच्या नावे असलेले शेत स्वतःच्या नावे करण्यासाठी तगादा लावत होता. शेत नावावर करण्यासाठी तो आईला वारंवार धमक्या देत होता.

---Advertisement---

आई लक्ष देत नसल्याने सुगंधाबाई झोपेत असताना मद्यप्राशन करून आलेल्या नवल याने तिला जाळण्याचा प्रयत्न केला. सुगंधाबाई हा गंभीर जळल्या असून त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी नवल पाटील याला अटक केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी दिली आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---