जळगाव लाईव्ह न्यूज । जळगावहून वरणगावकडे लाकडी पाट्यांची वाहतूक करणारा ट्रक (आरजे.१८-जीबी.७२९५) पहाटे अचानक स्टिअरिंग जाम झाल्याने उड्डाणपुलाजवळ दुभाजकावर जाऊन आदळला. ही घटना पहाटे सुमारास २.३० वाजता घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

ट्रक दुभाजकावर धडकल्याने पुढील चाक तुटून पडले. अपघातानंतर मुंबई -आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही वेळ मंदावली. रात्रीच्या वेळी ट्रकचा अपघात झाल्याने चालक आणि इतर वाहनचालकांना अडचण निर्माण झाली. मात्र, अपघाताची माहिती मिळताच तालुका पोलिस, महामार्ग विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठले. वाहतुकीला येणारे अडथळे दूर केले.






