---Advertisement---
जळगाव जिल्हा गुन्हे

शिरसोली ते जळगाव दरम्यानच्या रेल्वे रूळावर तरुणाचा मृतदेह आढळला

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २० सप्टेंबर २०२३ । शिरसोली ते जळगाव दरम्यानच्या डाऊन रेल्वे रूळावर अनोळखी तरूणाचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी रामानंदनगर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, मयताची ओळख पटविण्याचे आवाहन पोलीसांनी केले आहे.

patri jpg webp

शिरसोली ते जळगाव डाऊन रेल्वे मार्गावर मंगळवारी १९ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास एका अनोखळी ३५ ते ४० वर्षीय तरूणाचा मृतदेह आढळून आल्याची घटना उघडकीला आली आहे. याबाबत उपस्टेशन प्रबंधक के.जी.चौधरी यांनी रामानंद नगर पोलीसांना माहिती दिली. त्यानुसार रामानंद नगर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेहाचा पंचनामा केला आणि मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला.

---Advertisement---

मयताची ओळख पटेल असे कोणतीही माहिती समोर आली नाही. याबाबत रामानंद नगर पोलीस ठाण्यात दुपारी ३ वाजता अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताची ओळख पटविण्याचे आवाहन केले असून नातेवाईकांनी रामानंद नगर पोलीस ठाण्यात संपर्क साधावा असे आवाहन केले आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोपाल देशमुख करीत आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---