⁠ 
बुधवार, जून 26, 2024

बद्रीनाथमध्ये झळकले ना.गुलाबराव पाटलांचे बॅनर; पहा व्हिडिओ..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज | चारधाम पैकी एक असलेल्या बद्रीनाथ धाम मंदीरात जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या विजयासाठी प्रार्थना करण्यात आली. यावेळी बद्रीनाथ मंदीराबाहेर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व ना.गुलाबराव पाटील यांचे फोटो असलेले बॅनर झळकवत ना.गुलाबराव पाटील यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

गंगोत्री, यमुनोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ या उत्तराखंडमधील चार पवित्र तीर्थक्षेत्राची यात्रा ‘चार धाम यात्रा’ म्हणून ओळखली जाते. गेल्या सहा महिन्यांपासून हिमवर्षामुळे बंद असलेल्या या पवित्र ठिकाणाचे दर्शन भक्तांसाठी खुले झाले आहेत. चार धाम यात्रा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र यात्रा समजली जाते. दरवर्षी लाखो भाविक या पवित्र तीर्थस्थानांना भेट देतात. यापैकी बद्रीनाथ मंदिराचे दर्शन घेण्यासाठी पाळधी येथील तरुण गेल्या आठवड्यात रवाना झाले होते.

https://www.instagram.com/reel/C8TyGy_SrzY/?igsh=MTVlN3VjeHF6OHhhdA==

पाळधी येथील भोई वाडा परीसरातील लोकमान्य मित्र मंडळ चे सद्स्य यांनी आज बद्रीनाथ महादेव मंदिर येथे दर्शन घेतले तसेच आपले जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री कॅबिनेट ना.गुलाबराव पाटील यांचा फोटो झळकवत गुलाबभाऊंच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. गुलाबभाऊ तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है…,जय भवानी, जय शिवाजी… अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.