---Advertisement---
जळगाव जिल्हा

रेशनकार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी! रेशन देण्याच्या नियमात प्रशासनाने केला मोठा बदल

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १० ऑक्टोबर २०२३ । रेशनकार्ड धारकांसाठी एक महत्वाची बातमी आहे. स्वस्त धान्य दुकानातून देण्यात येणारे धान्य पूर्वी त्या महिन्यात घेतले नसल्यास, पुढील महिन्याच्या सात दिवसांत घेण्याची मुभा होती. मात्र, आता ही मुभा बंद करण्यात आली.

ration jpg webp

आता त्याच महिन्यात धान्य घेण्याची सक्ती करण्याचा निर्णय अन्न नागरी पुरवठा विभागाने घेतला आहे. त्यामुळे उर्वरित धान्याचा होणारा काळाबाजार रोखणे शक्य होणार आहे. या संदर्भात अन्न नागरी पुरवठा विभागाने राज्यातील सर्व स्वस्त धान्य विक्रेत्यांना परिपत्रक पाठविले आहे.

---Advertisement---

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतून शिधापत्रिकाधारकांना प्रति व्यक्ती दोन किलो गहू आणि तीन किलो तांदूळ देण्यात येतो. मात्र, लाभार्थी एकाच वेळी हे धान्य घेत नाहीत. त्यामुळे त्यांना पुढील महिन्याच्या सात तारखेपर्यंत धान्य घेण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे एकदा धान्य घेण्याचे चुकले, तरी पुढील सात तारखेपर्यंत मुदत मिळाल्याने, मागील व चालू महिन्याचे असे दोन वेळचे धान्य एकाच वेळी मिळणे सोपे होते. मात्र यामुळे शिल्लक धान्याचा साठा आणि अतिरिक्त साठा यांची बेरीस वजाबाकी करण्याचे काम विक्रेत्यांना करावे लागत होते.

याचा गैरफायदा घेऊन यातून संबंधित स्वस्त धान्य दुकानदार काळाबाजार करण्याची शक्यता होती,शिल्लक धान्याची विक्री करणे बंधनकारक असल्यामुळे त्या शिल्लक धान्याचा सर्व हिशोब तालुक्याच्या किंवा शहराच्या अन्न धान्य वितरक अधिकाऱ्यासह जिल्ह्याच्या पुरवठा अधिकाऱ्याला देणे भाग होते.त्यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना अडचणी निर्माण होत असल्याचे लक्षात आले होते.

घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय बैठकीमध्ये स्वस्त धान्य वितरणातील त्रुटी बाबत चर्चा करण्यात आली.चालू महिन्यात लाभार्थ्यांचे धान्य घेण्याचे राहिले असल्यास ते धान्य घेण्यासाठी पुढील महिन्याच्या 7 तारखेपर्यंत मुभा देण्याच्या ऐवजी त्याच महिन्यात घेण्याची सक्ती करण्यात यावी.त्यामुळे एकूण महिन्यातील लाभार्थ्यांचा विचार करून धान्याचा कोठा विक्रत्यांना देता येऊ शकणार आहे.व तसेच सरकार कडून तेवढ्याच प्रमाणामध्ये धान्याचा कोठा घेता येईल,व असे केल्यामुळे राज्यातील धान्याचा होणारा काळाबाजार रोखता येईल.

पाच लाख कार्डधारक
जळगाव जिल्ह्यात अंत्योदय शिधापत्रिकाधारकांची संख्या १ लाख ३४ हजार ८६२ तर २१ लाख ५६ हजार ८४७ एपीलधारक आहेत. त्यांना आता त्या-त्या महिन्यातच रेशन घ्यावे लागणार आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---