जळगाव लाईव्ह न्युज । ३० जुलै २०२१ । महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा घेण्याची जबाबदारी शासनाने पुणे कार्यालयावर सोपवले असून रविवार दिनांक १० ऑक्टोबर २०२१रोजी घेण्याचे निश्चित केले आहे
सर्व व्यवस्थापन, अनुदानित ,विनाअनुदानित, कायम,सर्व माध्यम सर्व मंडळ इत्यादी शाळांमध्ये शिक्षक सेवक व शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथम केव्हा ही परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असते या परीक्षेची संबंधित सर्व शासन निर्णय माहिती सूचना महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र परिषदेच्या या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.
ऑनलाईन अर्ज भरणे परीक्षा शुल्क भरणे परीक्षेची वेळ व इतर सविस्तर माहिती तपशील परिषदेच्या वेबसाईटवर देण्यात आला आहे.
सर्व संबंधित नियमित भेट घ्यावी सदर परीक्षेची ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रवेश दिनांक ३ ऑगस्ट २०२१पासून सुरू होत असून दिनांक २५ ऑगस्ट २०२१ अखेरपर्यंत उमेदवारांना ऑनलाइन अर्ज भरता येईल संबंधितांनी याची नोंद घ्यावी.