अरे बापरे! खेळताना बालकाच्या पायामध्ये घुसले टेस्टर, पाचोऱ्यातील घटना

ऑगस्ट 30, 2025 9:56 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । पाचोरा तालुक्यातील भातखंडे येथून एक धक्कादायक घटना समोर आलीय. ज्यात खेळताना बालकाच्या पायामध्ये टेस्टर आरपार घुसले. वेदांत विनोद गायकवाड (वय ७)असं जखमी बालकाचे नाव असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. दरम्यान जखमी वेदांतला पाचोऱ्यात प्राथमिक उपचार केल्यांनतर जळगाव येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

vedant

खरंतर आजही ग्रामीण भागात लहान बालके विटी दांडू, गिलोरी, यासारखे खेळ खेळत असतात. एक टोकदार गाडी किंवा असारीचा तुकडा घेऊन लहान मुले जमिनीवर फेकून मारून हा खेळ खेळतात. हा खेळ खेळत असताना जोपर्यंत एकाची सळई जमिनीत रुतत राहते तोपर्यंत तो पुढे पुढे खेळत राहतो. मात्र एकदा का ती सगळी जमिनीवर पडली त्यानंतर दुसऱ्याचा नंबर खेळण्यासाठी लागतो.

Advertisements

असाच एक खेळ टेस्टर पाच-सात मुलं खेळत होते. यात वेदांत गायकवाड हा पुढे चालत असताना त्याच्या एका सवंगड्याकडून टेस्टर जमिनीवर मारण्यासाठी फेकण्यात आला. मात्र तो जमिनीवर न पडता वेदांत यांच्या डाव्या पायाच्या मध्यभागी पडल्याने ते टेस्टर थेट पायात आरपार घुसले. यानंतर एकच धावपळ उडाली. वेदांत यास प्रथमोपचारासाठी पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Advertisements

मात्र पायात रूतलेला टेस्टर निघत नसल्याने या बालकास जळगाव येथे हलवण्यात आले. वेदांत याचे घरची परिस्थिती अतिशय नाजूक असून त्याचे वडील आईपासून लांब राहत आई एकटीच सांभाळ करते. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने त्यास अखेर खासगी रुग्णालयात उपचार न घेता जळगाव येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. दरम्यान या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now