पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणात मोठी कारवाई; पुण्यातील तहसीलदार निलंबित

नोव्हेंबर 6, 2025 4:04 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ नोव्हेंबर २०२५ । एकीकडे राज्यातील स्थानिक निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या असतानाच शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्यावर जमीन घोटाळ्याचा आरोप केला आहे. पार्थ पवार यांच्या कंपनीने 1800 कोटींची जमीन केवळ 300 कोटी रुपयांत विकत घेतल्याचा आरोप असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या जमीन खरेदी प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान जमीन घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई झाली असून पुणे तहसीलदार सूर्यकांत येवले यांना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहे.

parthpawar

अंबादास दानवेंचा आरोप काय?

पुण्यातल्या कोरेगाव पार्कमधल्या या जवळपास 40 एकर जमिनीची किंमत आहे किमान 1800 कोटी आहे. मात्र पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीने ही जमीन फक्त 300 कोटी रुपयांत विकत घेतली आणि या व्यवहारासाठी केवळ 500 रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरली. एवढेच नव्हे तर ही जमीन कोरेगाव पार्क परिसरात असून, तिथे आयटी पार्क आणि डेटा सेंटर उभारण्याची योजना करण्यात आली आहे. एक लाख रुपयांच्या भांडवलाची कंपनी एवढा मोठा व्यवहार कसा करू शकते? असा सवालही दानवे यांनी उपस्थित केला आहे. तसेच उद्योग संचालनालयाने फक्त 48 तासांत स्टॅम्प ड्युटी माफ केल्याचा आणि फक्त 27 दिवसांत संपूर्ण व्यवहार पूर्ण झाल्याचा त्यांनी आरोपही त्यांनी केला आहे. दरम्यान जमीन व्यवहार प्रकरणाची दखल मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतली असून त्यांनी योग्य ते चौकशीचे आदेश दिले आहे.

Advertisements

या प्रकरणात अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेत चौकशी समिती स्थापन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. पुणे तहसीलदार सूर्यकांत येवले यांना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहे.

Advertisements

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now