---Advertisement---
जळगाव जिल्हा पारोळा

तहसीलदारांना शिवीगाळ, धक्काबुक्की, ५ जणांविरुद्ध गुन्हा

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ नोव्हेंबर २०२१ । १९ दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या दांपत्यासह अन्य दोघांनी, शुक्रवारी ( दि. १२ ) रोजी  तहसीलदारांच्या दालनात जबरदस्ती प्रवेश करून, त्यांना शिविगाळ करत धक्काबुक्की केली. याप्रकरणी तहसीलदार अनिल गव्हांदे यांच्या फिर्यादीवरून पाच जणांविरोधात पारोळा पोलिसात गुन्हा दाखल झाला.

सविस्तर असे की,  तहसीलदार अनिल गव्हांदे यांनी फिर्याद दिली. २५ ऑक्टोबरपासून नितीन वना पाटील व त्यांच्या पत्नी रंजना पाटील हे तहसीलच्या प्रवेशद्वाराजवळ उपोषणास बसले होते. त्यांचा बाजार समिती संकुलात क्रमांक ३ हा गाळा आहे. त्यापुढील अतिक्रमण काढण्याच्या मागणीसाठी ते उपोषण करत होते. याबाबत बाजार समितीने सहायक निबंधकांना पत्र देऊन अतिक्रमण काढले गेले होते. त्यानंतरही पाटील दांपत्याचे उपोषण सुरू होते. दरम्यान, त्यांच्या गाळ्यासमोर पुन्हा अतिक्रमण झाल्याचा आरोप करत ९ नोव्हेंबरला दांपत्याने, शासकीय वाहनासमोर येत वाहनाची चाबी काढून घेत, चिरडण्याचा खोटा आव आणला. अशी तक्रार तहसीलदार अनिल गव्हांदे यांनी पोलिसांत दिली आहे. त्यानंतर १२ रोजी पाटील दांपत्यासह पाचोरा येथील त्यांचे नातेवाईक रवींद्र शांताराम पाटील, मनोज शांताराम पाटील व संदीप शालिक पाटील यांनी तहसीलदारांच्या दालनात प्रवेश केला. तसेच आम्हाला लेखी द्या अशी मागणी करत संबंधितांनी तहसीलदारांना धक्काबुक्की, शिवीगाळ केली. प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी पारोळा गाठून पोलिस निरीक्षक संतोष भंडारे यांच्याकडून माहिती घेतली. घटनेनंतर महसूल कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले.

---Advertisement---

आरोप निराधार

आम्ही मागील १९ दिवसांपासून कुटुंबासह उपोषणास बसलो होतो. आम्हाला न्याय न देता, व्यवस्थित वागणूकही देत नाही. तहसीलदारांना शिवीगाळ व धक्काबुक्की केलेली नाही. आमच्यावर करण्यात आलेले आरोप निराधार आहेत. नितीन पाटील, उपोषणकर्ते

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---