जळगाव लाईव्ह न्यूज । ४ मार्च २०२१ । दुचाकीने चंदन बर्डी (जळू) येथे जिल्हा परिषद शाळेत जात असताना राष्ट्रीय महामार्गावर पसरलेल्या खडीवर दुचाकी घसरली. त्याचवेळी बाजूने जाणाऱ्या ट्रकच्या मागील चाकाखाली आल्याने शिक्षिका व तिचा मुलगा ठार झाल्याची घटना आज सकाळी एरंडोल ते धारागीर दरम्यान घडली. दुचाकीचालक शिक्षिका कविता कृष्णकांत चौधरी, (वय ३७ ) व मागे बसलेला त्यांचा मुलगा लावंण्य (वय १०) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत.

जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका कविता चौधरी ह्या मुलगा लावण्यला दुचाकी (एमएच १९ डीबी ८७७९) ने दररोजप्रमाणे घेवून शाळेत जात होत्या. यादरम्यान, आज सकाळी १० वाजेच्या सुमारास मुलाला घेवून सोबत जात असतांना ट्रक ट्राला (जीजे २६ टी ८२६४) ने धडक दिली. यात माय लेकांचा मागच्या चाकात येवून जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती कळताच एरंडोलचे पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव, सहाय्यक पोलिस निरीक्षक तुषार देवरे, अकिल मुजावर, संदीप सातपुते, मिलिंद कुमावत, पंकज आदींनी घटनास्थळी धाव घेत नागरीकांच्या मदतीने मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवले.