---Advertisement---
वाणिज्य

लवकरच येते आहे टाटाची नवीन इलेक्ट्रिक कार; फक्त ६० मिनिटांत होईल फुल चार्ज : बुकिंग सुरु

tata-tigor-ev
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । देशातील सर्वात मोठी वाहन उत्पादक टाटा मोटर्सने Tata Motors आज आपली नवीन इलेक्ट्रिक कॉम्पॅक्ट सेडान कार टिगोर ईव्ही Tata Tigor EV देशांतर्गत बाजारात सादर केली. ही नवीन इलेक्ट्रिक कार कंपनीच्या झिपट्रॉन तंत्रज्ञानावर आधारित आहे. या गाडीचे बुकिंग सुरु करण्यात आले असून 21 हजार रुपये भरावे लागतील.

tata-tigor-ev

Nexon EV नंतर कंपनीने देऊ केलेली ही दुसरी इलेक्ट्रिक कार Tata Electric car आहे. कंपनीने नवीन टाटा टिगोर इलेक्ट्रिकच्या किंमतीबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही. सूत्रांच्या मते ही कार 13.99 लाख ते 16.85 लाख रुपयांच्या दरम्यान मिळू शकते. पेट्रोल टिगोरपेक्षा इलेक्ट्रिक टागोर सुमारे 1.5 लाख ते 2 लाख रुपये अधिक महाग राहील.

---Advertisement---

बहुप्रतीक्षित टाटा टोगोर ईव्ही Tata Tigor Electric आतापर्यंत फक्त सरकारी कार्यालये आणि फ्लीट ऑपरेटरसाठी उपलब्ध होती, परंतु आता ही कार खाजगी ग्राहकांसाठीही सादर करण्यात आली आहे. ही नवीन इलेक्ट्रिक कार टिगोरच्या पेट्रोल फेसलिफ्ट मॉडेलवर आधारित आहे, जी कंपनीने गेल्या वर्षीच सादर केली होती.

tata-tigor-ev-interior
टाटा टागोर ईव्ही । Tata Tigor EV

पॉवरट्रेन आणि चार्जिंग:

नवीन Tigor EV साठी सर्वात मोठे अपडेट पॉवरट्रेन फ्रंटवर दिसत आहे, जे आता कंपनीच्या Ziptron EV पॉवरट्रेनने सुसज्ज आहे. हे तंत्रज्ञान प्रथम नेक्सन इलेक्ट्रिकमध्ये वापरले गेले. त्याची इलेक्ट्रिक मोटर 75hp पॉवर आणि 170Nm पीक टॉर्क तयार करते. कंपनीचा दावा आहे की ही कार 0 ते 60 किलोमीटर प्रति तासाचा वेग फक्त 5.7 सेकंदात गाठते.

कंपनीने या कारमध्ये 26kWh क्षमतेची लिथियम-आयन बॅटरी वापरली आहे. बॅटरी पॅक आणि इलेक्ट्रिक मोटरचे IP67 रेटिंग देखील देण्यात आले आहे. नवीन झिपट्रॉन तंत्रज्ञानासह, टिगोर ईव्ही आता जलद चार्जिंगसह येते. फास्ट चार्जरमुळे, Tigor EV फक्त 60 मिनिटांत 0 ते 80 टक्के चार्ज होऊ शकते. टाटा मोटर्स या कारच्या बॅटरी आणि मोटरसह 8 वर्षे / 1,60,000 किमीची वॉरंटी देखील देत आहे.

नवीन टागोर ईव्ही आतून देखील सध्याच्या टिगोरसारखीच असेल. कारच्या आतही निळ्या अॅक्सेंटचा चांगला वापर केला गेला आहे. जे या कारला इलेक्ट्रिक अपील देते. वैशिष्ट्यांमध्ये Apple कार प्ले आणि अँड्रॉइड ऑटोसह 7.0 इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 4 स्पीकर्स आणि 4 ट्विटर, इरा कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी, मल्टी-फंक्शन स्टीयरिंग व्हील, ऑटोमेटिक क्लायमेट कंट्रोल, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर यांचा समावेश आहे.  क्षा वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, टिगोर EV मध्ये ड्युअल एअरबॅग, EBD सह ABS, मागील पार्किंग सेन्सर, मागील पार्किंग कॅमेरा, सीट बेल्ट रिमाइंडर आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---