गुन्हेजळगाव जिल्हा

धावत्या रेल्वेसमोर झोकून तरसोदच्या तरुणाने संपविले जीवन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जुलै २०२४ । जळगाव ते भादलीदरम्यान धावत्या रेल्वेसमोर झोकून देत एका तरुणाने आत्महत्या केली. रवींद्र भोजू अलकारी (४२, रा. तरसोद, ता. जळगाव) असे मयताचे नाव असून आत्महत्या मागचे कारण अद्याप समजू शकले नाहीय. याबाबत तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

जळगाव तालुक्यातील तरसोद येथील राहणार रवींद्र भोजू अलकारी यांनी जळगाव ते भादलीदरम्यान रेल्वेखाली आत्महत्या केली. जळगाव ते भादली दरम्यान डाऊन रेल्वे मार्गावर खांबा क्रमांक ४२६/९ ते ४२६/११ दरम्यान एकाने रेल्वेसमोर आत्महत्या केल्याची माहिती लोको पायलटने भादली स्थानकावर उपस्टेशन प्रबंधकांना दिली.(केसीएन)त्यानंतर या विषयी तालुका पोलिसांना कळविण्यात आले. त्या ठिकाणी पोहेकॉ विलास शिंदे व सहकारी पोहचले. मयताच्या खिशात विजेचे बिल व पाकीटात आधार कार्ड सापडले.

त्यावरून रवींद्र अलकारी, रा. तरसोद अशी त्यांची ओळख पटली. तसेच त्या ठिकाणी असलेले गँगमन तरसोद गावातीलच असल्याने त्यांनीही लगेच ओळखले. त्यानुसार गावात पोलिस पाटील व कुटुंबीयांना माहिती देण्यात आली. (केसीएन)त्यानंतर मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आला.
या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ विलास शिंदे करीत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button